वारंवार रिचार्जची गरजच नाही! तब्बल १८० दिवसांच्या वैधतेसह येतो 'हा' स्वस्त प्लान; मिळेल २७० जीबी डेटा-फ्री कॉलिंग
नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक शानदार प्लान्स आणत असतात. वोडाफोन आयडियाकडे (Vi) स्वस्त प्रीपेड प्लान्सची मोठी लिस्ट आहे. इतर प्रतिस्पर्धी कंपन्या , भारती एअरटेलच्या तुलनेत वीआयच्या ग्राहकांची संख्या कमी झाली असली तरीही कंपनी अनेक शानदार प्लान्स ऑफर करत आहे. कडे असाच एक शानदार प्लान असून, यात जास्त वैधतेचा फायदा मिळतो. वोडाफोन आयडियाच्या या प्लानची वैधता तब्बल १८० दिवस आहे. या प्लानमध्ये डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंगसह अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळतो. या प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Vi चा १,४४९ रुपयांचा प्रीपेड प्लान वोडाफोन आयडियाकडे १,४४९ रुपये किंमतीचा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये कंपनी १८० दिवसांची वैधता देत आहे. प्लानमध्ये यूजर्सला दररोज १.५ जीबी डेटा यानुसार एकूण २७० जीबी डेटाचा फायदा मिळतो. याशिवाय देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. या प्लानमध्ये दररोज १०० मोफत एसएमएससह अनेक अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळेल. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर या प्लानमध्ये बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट्स अंतर्गत दर महिन्याला २ जीबीपर्यंत डेटाचा फायदा मिळतो. या प्लानमध्ये यूजर्सला अॅपचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. या प्लानमध्ये मिळेल अतिरिक्त ४८ जीबी डेटा वोडाफोन आयडियाकडे ९०१ रुपये किंमतीचा देखील एक शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. प्लानची खास गोष्ट म्हणजे यात ४८ जीबी अतिरिक्त डेटाचा फायदा मिळेल. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसचा देखील फायदा या प्लानमध्ये मिळतो. हा प्लान ७० दिवसांच्या वैधतेसह येतो. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर या प्लानमध्ये यूजर्सला बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाइट्सचा फायदा मिळतो. तसेच, डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HAFDR4U
Comments
Post a Comment