एकच नंबर! 'या' स्पीकरला करू शकता उन्हात चार्ज, किंमत खूपच कमी, फीचर्सही मस्त

नवी दिल्ली: आजकाल अनेकांकडे स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही, आणि स्पीकर सारखे गॅझेट्स असतातच. गेल्या काही काळात इतर ट्रेंडी गॅझेट्स प्रमाणेच घरो- घरी स्पीकर वापरण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. तुम्ही देखील एक मस्त स्पीकर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, तुमच्याकडे स्वस्तात मस्त स्पीकर खरेदी करण्याची एक चांगली संधी आहे. भारतीय गॅजेट्स आणि अॅक्सेसरीज निर्माता iGear ने भारतीय बाजारपेठेत गोल्डी ही व्हिंटेज स्टाइल पोर्टेबल मल्टीफंक्शन ब्लूटूथ स्पीकर सिस्टम लाँच केली आहे. या ब्लूटूथ स्पीकरची खास गोष्ट म्हणजे तुम्ही iGear Goldie सूर्यप्रकाशाच्या मदतीने देखील चार्ज करू शकता. iGear Goldie मध्ये अंधारात प्रकाश देण्यासाठी इनबिल्ट फ्लॅशलाइट देण्यात आला आहे. जाणून घ्या iGear Goldie बद्दल सविस्तर. वाचा: iGear Goldie Price in India: या ब्लूटूथ स्पीकरची किंमत २००० रुपये आहे. iGear Goldie १ वर्षाच्या मोफत रिप्लेसमेंट वॉरंटीसह येईल. Amazon व्यतिरिक्त, ग्राहक हे डिव्हाइस igear.asia आणि Croma च्या अधिकृत साइटवरून खरेदी करू शकतात. ही स्पीकर सिस्टीम घराबाहेरही वापरता येईल अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे. iGear Goldie ब्लूटूथ स्पीकरमध्ये कंपनीने ५ -वॉट स्पीकर सिस्टम दिली आहे. ज्यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी USB, Bluetooth, MicroSD आणि Aux-in पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, iGear Goldie मध्ये असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही या ब्लूटूथ स्पीकरला कोणत्याही डिव्हाइसशी सहजपणे कनेक्ट करू शकाल. जबरदस्त पॉवरबॅकअपसाठी iGear Goldie मध्ये, कंपनीने १२०० mAh रिचार्जेबल बॅटरी दिली आहे. जी कोणत्याही ट्रेडिशनल मायक्रो-USB चार्जरद्वारे चार्ज केली जाऊ शकते. जर तुम्ही iGear Goldie हा ब्लूटूथ स्पीकर घराबाहेर वापरत असाल तर तुम्ही या स्पीकर सिस्टमची बॅटरी सूर्यप्रकाशाने देखील चार्ज करू शकता. कारण, कंपनीने या ब्लूटूथ स्पीकरच्या मागील पॅनलवर सोलर सेलचा वापर केला आहे जो सूर्यप्रकाशात इनबिल्ट बॅटरी रिचार्ज करण्यास मदत करतो. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WZorXJ9

Comments

clue frame