एकदाच करा रिचार्ज, वर्षभर टेन्शनच नाही! ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतात ‘हे’ प्लान्स; ३६० रुपयांची होईल बचत

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या , आणि वोडाफोन आयडियाकडे प्रीपेड प्लान्सची एक मोठी लिस्ट आहे. अगदी महिन्याभराच्या वैधतेपासून ते वर्षभराच्या वैधतेसह येणारे अनेक प्लान्स उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार यातील प्लान्स निवडू शकता. वारंवार रिचार्ज करायचा नसल्यास तुम्ही एकदाच वर्षभराचा रिचार्ज देखील करू शकता. त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला प्लान घ्यावा लागणार नाही. टेलिकॉम कंपनी एअरटेलकडे असेच दोन वर्षभराच्या वैधतेसह येणारे प्लान्स उपलब्ध आहेत. या पैकी एका प्लानद्वारे तुम्ही ३६० रुपयांची बचत करू शकता. एअरटेलने आपल्या २,९९९ रुपयांच्या प्लान अपग्रेड आहे. या प्लानमध्ये ३,३५९ रुपयांच्या प्लानमध्ये येणारे जवळपास सर्व बेनिफिट्स यात मिळतील. या दोन्ही प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. एअरटेलचे २,९९९ रुपये आणि ३,३५९ रुपयांचे प्लान्स टेलिकॉम कंपनी एअरटेलकडे २,९९९ रुपये आणि ३,३५९ रुपयांचे वर्षभराचे प्लान्स आहेत. या प्लान्समध्ये ३६५ दिवसांची वैधता मिलते. २,९९९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. याशिवाय, दररोज २ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएसचा फायदा मिळतो. प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्स देखील दिले जात आहेत. यात प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे मोफत ट्रायल, शॉ अकॅडेमीवर ऑनलाइन कोर्स, फास्टॅगवर १०० रुपये कॅशबॅक, फ्री हेलोट्यून्स आणि विंक म्यूझिकचे सबस्क्रिप्शन मिळेल. आधी या प्लानमध्ये डिज्नी प्लस हॉटस्टार मेंबरशिप मिळत नव्हती. २,९९९ रुपये आणि ३,३५९ रुपयांच्या प्लानमध्ये हाच एक मोठा फरक होता. परंतु, दोन्ही प्लान्समध्ये आता Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. ३,३५९ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला मोफत वॉइस कॉल, दररोज २ जीबी डेटा आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. इतर बेनिफिट्स समानच आहेत. त्यामुळे तुम्ही ३,३५९ रुपयांऐवजी २,९९९ रुपयांचा प्लान खरेदी करून ३६० रुपयांची बचत करू शकता. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/nrtRj57

Comments

clue frame