स्मार्टवॉचेसची आवड असेल तर स्टायलिश लूक्स आणि हेल्थ फीचर्ससह येणाऱ्या 'या' स्वस्त वॉचेस तुम्हाला नक्कीच आवडणार

नवी दिल्ली: गेल्या काही काळात स्मार्टवॉचची बाजारपेठ वाढली आहे. आजकाल स्मार्टवॉच एक स्टाईल स्टेटमेंट सुद्धा बनले आहे. अशात, तुम्ही देखील नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल. पण, नेमकी कोणती वॉच खरेदी करायची याबद्दल तुम्हाला 'कन्फ्युजन' असेल तर, आज आम्ही तुम्हाला ५,००० रुपयांपर्यंत उपलब्ध काही वॉचेसबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये ब्लड ऑक्सिजन सेन्सर, जीपीएस आणि ब्लूटूथ कॉलिंग उपलब्ध आहेत. लिस्टमध्ये पहिले नाव Redmi Watch 2 Lite चे आहे. यामध्ये १.५५ इंचाचा रंगीत डिस्प्ले आहे. याशिवाय, बॅटरीबाबत १० दिवसांच्या बॅकअपचा दावा करण्यात आला असून Watch 2 Lite ची किंमत ४,९९९ रुपये आहे. यामध्ये १.७५ -इंचाचा HD डिस्प्ले आहे. याशिवाय, याला वॉटर रेझिस्टंटसाठी IP68 रेटिंग मिळाले आहे. वाचा: याचा बॅटरी बॅकअप १४ दिवसांचा आहे. Realme Smart Watch 2 Pro ४,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. : ची किंमत ३,९९९ रुपये आहे. यामध्ये १.३ इंचाचा अल्ट्रा शार्प AMOLED डिस्प्ले आहे. यामध्ये तुम्हाला ऑलवेज ऑन डिस्प्ले देखील मिळेल. हार्ट रेट मॉनिटर सेन्सर व्यतिरिक्त, यात SpO2 सेन्सर देखील आहे. याला वॉटर रेझिस्टंटसाठी 5ATM ची रेटिंग मिळाली आहे. फायर-बोल्ट टॉकमध्ये ब्लूटूथ कॉलिंगसह फिटनेस ट्रॅकरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात ब्लूटूथ कॉलिंगसह विकले जाणारे हे सर्वात स्वस्त स्मार्टवॉच आहे. यात वॉटर रेझिस्टंटसाठी IPX7 रेटिंग देखील आहे. याशिवाय, यामध्ये अनेक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. याच्या बॅटरीबाबत ५ दिवसांचा बॅकअप असल्याचा दावा करण्यात आला आहे. फायर-बोल्ट टॉकची किंमत ४,९९९ रुपये आहे आणि ती केवळ फ्लिपकार्टद्वारे विकली जात आहे. ऑफर अंतर्गत, हे सध्या ४,४९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. Truke Horizon ची किंमत २,९९९ रुपये आहे. Truke Horizon स्मार्टवॉच GPS सह GLONASS, IP68 रेटिंग, खोल पाण्याच्या प्रतिकारासह, एकाधिक-सपोर्ट मोड आणि १६८ तासांपर्यंत चालणारी प्रचंड बॅटरीसह सुसज्ज आहे. Truke Horizon च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टवॉचमध्ये १.६९ इंचाचा फुल स्क्रीन टच एचडी कलर डिस्प्ले आहे. उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ ५.० फीचर आहे. स्मार्टवॉच २४ x ७ हार्ट-रेट सेन्सर, ब्लड ऑक्सिजन लेव्हल (SpO2), पेडोमीटर आणि स्लीप मॉनिटरसह अनेक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/V0h8aij

Comments

clue frame