नवी दिल्ली: अनेक मोठ्या कंपन्या होळीसारख्या सणानिमित्त त्यांच्या प्रोडक्टसवर मोठ्या प्रमाणात सूट देतात. विविध कंपन्या फेस्टिव्ह ऑफर्स देखील देतात. तुम्हाला जर तुमच्यासाठी चांगल्या कंपनीची आणि सर्व फीचर्सने परिपूर्ण अशी मॉडर्न स्मार्टवॉच खरेदी करायची असेल तर, तुमच्यासाठी सध्या एक चांगली संधी आहे. स्मार्टवॉच निर्माता ने देखील घोषणा केली आहे की, कंपनी होळीनिमित्त विशेष सेल सुरू करत आहेत. हा सेल ११ मार्चपासून सुरू होईल आणि १६ मार्च २०२२ पर्यंत चालेल. युजर्स Amazon आणि Amazfit India च्या अधिकृत वेबसाइटवरून Amazfit मोठ्या सवलतीत खरेदी करू शकतात. जाणून घेऊया कोणत्या स्मार्टवॉचवर किती सूट देण्यात येत आहे याबद्दल सविस्तर. वाचा: Amazfit वॉचेस युजर्समध्ये प्रचंड लोकप्रिय असून युजर्स या स्मार्टवॉचचे फॅन आहेत असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. तुम्ही देखील या कंपनीच्या भन्नाट स्मार्टवॉचेस मोठ्या सवलतीसह खरेदी करू शकता. Amazfit Bip U, ज्याची किंमत ३,४९९ रुपये आहे. सेल दरम्यान २,९९९ रुपयांना उपलब्ध होईल. Amazfit Bip U वॉचमध्ये बिल्ट-इन अॅलेक्सा, बिल्ट-इन जीपीएस सारखे फीचर्स मिळतात. यात १.४३ इंच एचडी टीएफटी एलसीडी कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ६० स्पोर्ट्स मोड, बायोट्रॅकर २ पीपीजी, ऑकिस्जन बीट्स सोमनसकेअर, ५ एटीएम वॉटर रेसिस्टेंट, वूमन हेल्थ ट्रॅकर आणि पीएआय सारखे फीचर्स आहे. त्याचप्रमाणे, Amazfit Bip U Pro वर देखील ५०० रुपयांची सूट आहे. त्याची किंमत सध्याच्या ४,९९९ रुपयांवरून ४,४९९ रुपये कमी केली जाईल. अॅमेझफिट स्मार्टवॉच जोडण्यासाठी तुम्हाला जे मोबाइल अॅप डाउनलोड करावे लागेल त्याला Zepp म्हणतात. Amazfit GTS 2 Mini, ६,९९९ रुपयांना मिळते. ती ६,४९९ रुपयांना उपलब्ध होईल. सेल Amazfit GTS 2e, Amazfit GTS 2, Amazfit GTR 2 Sports, Amazfit GTR 2 Classic आणि Amazfit GTS 3 वर सवलत देखील देत आहे. Amazfit उच्च दर्जाचे स्मार्टवॉच विकण्यासाठी ओळखले जाते. परवडणारी आणि बजेट श्रेणी किंवा प्रीमियम श्रेणीत, Amazfit मध्ये प्रत्येकासाठी काहीतरी ऑफर करण्यासारखे आहे. Amazfit GTS 3 हे एक सुपर प्रीमियम स्मार्टवॉच आहे जे स्क्वेअर १.७५ -इंच UHD AMOLED स्क्रीनसह येते. सेल दरम्यान त्याची किंमत १,०० रुपयांनी कमी होऊन १२,९९९ रुपये होईल. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/HfKWr0N
Comments
Post a Comment