स्वस्तात मस्त! खूपच कमी किंमतीत लाँच झाले ‘हे’ दोन शानदार स्मार्ट टीव्ही, घरीच मिळेल थिएटरचा आनंद

नवी दिल्ली : भारतीय बाजारात सातत्याने नवीन स्मार्ट टीव्हीची रेंज सादर करत आहे. आता कंपनीने ४० इंच एचडी रेडी आणि ४३ इंच फुल एचडी अँड्राइड टीव्हीला लाँच केले आहे. जर्मन ब्रँड Blaupunkt च्या ४० इंच स्मार्ट टीव्हीची किंमत १५,९९९ रुपये आहे. तर ४३ इंच स्मार्ट टीव्हीसाठी १९,९९९ रुपये खर्च करावे लागतील. या दोन्ही स्मार्ट टीव्हींची ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या माध्यमातून १२ मार्चपासून विक्री सुरू होईल. या स्मार्ट टीव्हींच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर Blaupunkt चा ४३ इंच १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज पर्यायासह येतो. वाचा: Blaupunkt च्या या स्मार्ट टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ३ HDMI पोर्ट आणि २ USB पोर्ट देखील दिले आहेत. हे दोन्ही मॉडेल HDR१० सपोर्टसह येतात. यामध्ये शॉर्प व्हिज्यूअल डिटेल्स आणि विविड कलर्सचा सपोर्ट मिळतो. स्मार्ट टीव्ही २ स्पीकर्स, एक डिजिटल नॉइज फिल्टर आणि एक ४० वॉट स्पीकर आउटपूटसह येतो. Blaupunkt स्मार्ट टीव्ही अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये मल्टीपल अ‍ॅप्स आणि गेम्सचा सपोर्ट दिला आहे. सोबतच, यूजर्स गुगल प्ले स्टोरच्या मदतीने इतर अ‍ॅप्सला देखील सहज डाउनलोड करू शकता. स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला , , सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळतो. Blaupunkt च्या ४० इंच स्मार्ट टीव्हीमध्ये ४०० नीट्स पीक ब्राइटनेस मिळेल. तसेच, अल्ट्रा थिन बेझल्स दिले आहेत. तर ४३ इंच स्मार्ट टीव्हीमध्ये ५०० नीट्स पीक ब्राइटनेस मिळते. या टीव्हीमध्ये बिल्ट-इन क्रोमकास्टचा सपोर्ट दिला आहे. विशेष म्हणजेच या स्मार्ट टीव्हींना तुम्ही डिस्काउंटसह स्वस्तात खरेदी करू शकता. Blaupunkt च्या स्मार्ट टीव्हींवर ७० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ऑफर मिळत आहे. तसेच, SBI क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी केल्यास १० टक्के डिस्काउंट देखील मिळेल. सोबतच, अन्य डिस्काउंट आणि ऑफर्सचा देखील फायदा मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/rIdan2q

Comments

clue frame