नवी दिल्ली : भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आणि प्रमुख बँकिंग संस्था ने मिळून ग्राहकांसाठी एक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. या नवीन कार्डचे नाव आहे. या खास क्रेडिट कार्डचा फायदा एअरटेलच्या ३४ कोटी ग्राहकांना होणार आहे. या कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना अनेक फायदे मिळतील. ग्राहक कार्डद्वारे पेमेंट करू शकतील, प्री-अप्रूव्हड इंस्टंट लोन, बिल पे केल्यावर कॅशबॅक यासह अनेक फायदे मिळतील. अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना मिळणाऱ्या फायद्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Airtel Axis Bank Credit Card चे फायदे
- कोणत्याही एअरटेल डीटीएच अथवा मोबाइल रिचार्ज, एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर आणि एअरटेल ब्लॅकदचे पेमेंट केल्यावर ग्राहकांना २५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅकचा फायदा मिळेल.
- Zomato, Swiggy आणि BigBasket वर १० टक्क्यांपर्यंत कॅशबॅकचा फायदा मिळेल.
- एअरटेल थँक्स अॅपच्या माध्यमातून वीज बिल, पाणी बिल अथवा गॅससाठी पेमेंट केल्यास १० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल.
- तसेच, अन्य कोणतेही पेमेंट केल्यास १ टक्के कॅशबॅकचा फायदा मिळेल.
- ग्राहकांना Axis Bank Credit Card घेतल्यावर ५०० रुपयांचे Amazon e-voucher मिळेल, ज्याचा वापर ३० दिवसांच्या आत करावा लागेल.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/D5O6bG8
Comments
Post a Comment