WhatsApp वर 'हा' इमोजी पाठवल्यास थेट जेल, २० लाखांचा दंड; 'या' देशात आहे नियम

नवी दिल्ली: हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे लोकप्रिय इंस्टंट आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण दिवसभर अनेकांशी संवाद साधत असतो. याशिवाय फोटो, व्हिडिओ, महत्त्वाच्या फाइल्स पाठवण्यासाठी देखील या अ‍ॅपचा उपयोग होतो. एवढेच नाही तर व्हिडिओ कॉलिंगची सुविधा देखील WhatsApp वर उपलब्ध आहे. मात्र, WhatsApp वर चॅट करताना केलेली एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. WhatsApp वर चॅट करताना आक्षेपार्ह्य भाषा वापरणे, हिंसेला प्रोत्साहन देणे अशा गोष्टी केल्यास शिक्षा-दंड होऊ शकतो. मात्र, तुम्हाला विश्वास बसणार नाही एका देशात चक्क इमोजीमुळे जेलची हवा खायला लागू शकते. हा देश आहे. रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाच्या सायबर तज्ञांचे म्हणणे आहे की, WhatsApp वर पाठवल्यामुळे यूजर्सला शिक्षा होऊ शकते. वाचा: २० लाखांच्या दंडासह ५ वर्षांची जेल रिपोर्टमध्ये दावा केला आहे, सौदी अरेबियामध्ये WhatsApp वर रेड हार्ट पाठवल्यास १,००,००० सौदी रियाल म्हणजे जवळपास २० लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. तसेच, दंडासोबतच २ ते ५ वर्षांची जेल देखील होऊ शकते. सौदी अरेबियाच्या एंटी फ्रॉड असोसिएशनचे सदस्य अल मोआताज कुतबी यांनी म्हटले आहे की, व्हॉट्सअॅपवर रेड हार्ट इमोजी पाठवणे म्हणजे छळ आहे. ते म्हणाले की, ऑनलाइन चॅट दरम्यान काही फोटो आणि इमोजी हे छळाच्या गुन्ह्यात मोडू शकतात. मात्र, कोणत्याही व्यक्तीवर कारवाईसाठी त्याच्याविरोधात दुसऱ्या व्यक्तीने गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. लाल गुलाबाचा इमोजी देखील धोकादायक कुतबी यांनी याबाबत लोकांना माहिती देण्यासाठी एख रिलीज देखील जारी केले आहे. यामध्ये खासकरून रेड हार्ट इमोजीबाबत सावध केले आहे. कुतबी यांच्यानुसार, कोणत्याही व्यक्तीद्वारे अन्य व्यक्ती प्रती शारिरिक संबंधाची भावना व्यक्त करणे अथवा तसा इशारा करणे, हावभाव, स्पर्श करणे या गोष्टी छळाच्या गुन्ह्यात मोडतात. यामध्ये इमोजीचा देखील समावेश आहे. रेड हार्ट इमोजीसोबतच लाल गुलाब असलेली इमोजी देखील तुमच्यासाठी समस्या ठरू शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/FwvfN2s

Comments

clue frame