६५W चार्जिंग, ६४MP कॅमेऱ्यासह OnePlus चा ‘हा’ दमदार ५जी स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या काय आहे खास

नवी दिल्ली: ने आपल्या बहुचर्चित स्मार्टफोनला भारतात लाँच केले आहे. हा फोन बहामा ब्लू आणि ग्रे मिरर रंगात येतो. या फोनची विक्री २२ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, फोनला OnePlus ची अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोरवरून खरेदी करता येईल. OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये डायमेंसिटी ९०० प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. याशिवाय ६५ वॉट सुपर VOOC फास्ट चार्जिंगचा देखील यात सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: OnePlus Nord CE 2 5G ची किंमत
  • ६GB रॅम + १२८GB स्टोरेज – २३,९९९ रुपये
  • ८GB रॅम + १२८GB स्टोरेज – २४,९९९ रुपये
OnePlus Nord CE 2 5G चे स्‍पेसिफ‍िकेशन्स OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंच फ्लूइड एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये एचडीआर१०+ आणि गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शन मिळेल. OnePlus Nord CE 2 5G मध्ये डायमेंसिटी ९०० प्रोसेसरसह ८ जीबीपर्यंत LPDDR४X रॅम आणि १२८ जीबीपर्यंत UFS २.२ इंटर्नल स्टोरेज मिळते. हा फोन अँड्राइड ११ आधारित OxygenOS ११ वर काम करतो. वनप्लसच्या या ५ जी स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. याचे अपर्चर एफ/१.७ आहे. सोबतच, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस दिली आहे. तसेच, १६ मेगापिक्सलचा EIS सेल्फी कॅमेरा मिळतो. OnePlus Nord CE 2 5G ३.५ एमएम हेडफोन जॅक सपोर्टसह येतो. फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ६५ वॉट SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनचे वजन १७३ ग्रॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ५G, ४G LTE, Wi-Fi ६, ब्लूटूथ ५.१, NFC, GPS आणि A-GPS सपोर्ट दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/U2LBnsN

Comments

clue frame