Vivo T1 5G चा आज भारतात पहिला सेल, डिस्काउंटसह फोनची किंमत आणि ऑफर्स पाहा

नवी दिल्ली: निर्माता कंपनी ने ९ फेब्रुवारीला आपला नवीन हँडसेट ला भारतात लाँच केले होते. या स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरू झाली आहे. टी१ ५जी च्या प्रमुख स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यामध्ये स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी प्रोसेसर, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले, ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी यासारखे फीचर्स मिळतील. विशेष म्हणजे ग्राहकांना पहिल्या सेलमध्ये डिस्काउंटचा देखील फायदा मिळेल.Vivo T1 5G स्मार्टफोनला भारतात तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. वाचा: Vivo T1 5G फोनच्या ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,९९० रुपये आहे. तर ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,९९० रुपये आणि ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १९,९९० रुपये आहे. विवोचा हा फोन रेनबो फँटसी आणि स्टारलाइट ब्लॅक रंगात येतो. शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरून हा फोन तुम्ही खरेदी करू शकता. फोन खरेदी करताना एचडीएफसी बँक कार्डधारकांना १ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट देखील मिळेल. अशाप्रकारे, फोनला १४,९९० रुपयांच्या सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. Vivo T1 5G स्मार्टफोनमध्ये ६.५८ इंच फुल एचडी+ (१०८०x२४०८ पिक्सल) आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. विवोच्या या डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी प्रोसेसरसह ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळते. फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डने १ टीबीपर्यंत वाढवू शकता. यात फिंगरप्रिंट सेंसरसह यूएसबी टाइप-सी पोर्ट देखील दिला आहे. फोटोग्राफीसाठी Vivo T1 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात एफ/१.८ अपर्चरसह ५० मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि एफ/२.४ अपर्चरसह दोन २ मेगापिक्सलचे सेकेंडरी सेंसर आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. ६ जीबी आणि ८ जीबी रॅम व्हेरिएंटमध्ये सुपर नाइट मोडसह मल्टी स्टाइल पोर्ट्रेट मोड देखील मिळतो. फोनमध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/cpTBAeb

Comments

clue frame