Video: पाण्यात बुडवले, वरून कारही गेली... तरीही ‘या’ फोनला काहीच झाले नाही; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: पाण्यात पडल्यास अथवा त्यावरून गाडी गेल्यास काय होईल? अर्थातच, त्या फोनचा चुराडा होईल. मात्र, नुकताच भारतात लाँच झालेला स्मार्टफोन या टेस्टमध्ये पास झाला आहे. युट्यूब चॅनेल PBKReviews वर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये Galaxy S22 Ultra स्मार्टफोनवर करण्यात आलेले टेस्ट दिसत आहे. विशेष म्हणजे फोन या सर्व टेस्टमध्ये पास होतो. PBKReviews ने Durability च्या बाबतीत गॅलेक्सी एस२२ अल्ट्राला १० पैकी ९.५ रेटिंग दिली आहे. गेल्या आठवड्यात अशाप्रकारेच करण्यात आलेल्या एका टेस्टमध्ये vanilla Galaxy S22 model ला १० पैकी १० रेटिंग दिले होते. Samsung Galaxy S22 Ultra मजबूत असण्यासोबतच, यात अनेक शानदार फीचर्स देखील दिले आहे. वाचा: Samsung ने Samsung Galaxy S22, Samsung Galaxy S22+, Samsung Galaxy S22 अल्ट्रा आणि Galaxy Tab S8 Series ला भारतात लाँच केले आहे. या लाँच इव्हेंटमध्ये कंपनीने माहिती दिली होती की, सॅमसंग गॅलेक्सी एस२२ सीरिजचे स्मार्टफोन Armor Aluminum आणि Gorilla Glass Vacts+ प्रोटेक्शनसह येतात. Galaxy S22 Ultra च्या मागील व पुढील, दोन्ही बाजूला हे फीचर दिले आहे. यामुळे फोन खाली पडल्यानतंरही सुरक्षित राहतो. या फोनवर टेस्ट केल्यानंतर काय परिणाम आला ते जाणून घेऊया. पाणी आणि स्क्रॅच टेस्ट सर्वात प्रथम Samsung Galaxy S22 Ultra ची वॉटर रेसिस्टेंट क्षमता तपासण्यासाठी पाण्यात बुडवण्यात आले. पाण्याचा फोनवर कोणताही परिणाम झाला आहे. हा फोन वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंटसाठी आयपी६८ रेटिंगसह येतो. यानंतर फोनवर स्क्रॅच टेस्ट करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, फिंगरप्रिंट एरियावर स्क्रॅचिंग केल्यानंतरही सेंसरवर कोणताही परिणाम झाला नाही. स्मार्टफोनच्या साइड मेटलच्या आहेत. तर एंटिना एरियाला प्लास्टिकने कव्हर केले आहे. बेंड आणि कार टेस्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे की, Galaxy S22 Ultra चे बेंड टेस्ट देखील केले. टाइट पॉकेटमध्ये ठेवल्यावर काय होईल हे जाणून घेण्यासाठी ही टेस्ट केली. परंतु, यात देखील फोन पास झाला. एवढेच नाही तर या फोनवरून कार देखील गेली. मात्र, फोनला काहीही झाले नाही व फोन काम करत होतो. या टेस्टमध्ये फोनवर काही प्रमाणात स्क्रॅच आले. मात्र एवढ्या टेस्टनंतर देखील फोन व्यवस्थित काम करत होता. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/LmYs1BU

Comments

clue frame