नवी दिल्ली: गेल्या वर्षी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लान्सच्या किंमती वाढवल्या होत्या. आता यावर्षी पुन्हा खासगी टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लान्सच्या किंमती वाढवत ग्राहकांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. कंपन्यांनी डिसेंबर २०२१ मध्ये प्रीपेड टॅरिफमध्ये वाढ केली होती. भारती एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल यांनी म्हटले आहे की, २०२२ मध्ये पुन्हा प्रीपेड टॅरिफमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, हे पुढील तीन-चार महिन्यात होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. केवळ एअरटेलच नाही तर आता वोडाफोन आयडियाने देखील प्रीपेड टॅरिफमध्ये वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. वोडाफोन आयडियाचे सीईओ रविंदर टक्कर म्हणाले की, कंपनी टॅरिफमध्ये वाढ करण्यासाठी दोन वर्ष वाट पाहणार नाही. २०२२ मध्येच टॅरिफमध्ये वाढ करेल. टेलिकॉम कंपन्या सध्या सिम कंसॉलिडेशनबाबत चिंतेत आहेत. सिम कंसोलिडेशन स्तर खाली गेल्यानंतरच टॅरिफमध्ये वाढ केली जाईल. वाचा: एअरटेलने वारंवार एव्हरेज रेवेन्यू पर यूजरचे (एआरपीयू) लक्ष्य २०० रुपये असल्याचे म्हटले आहे. तर दीर्घकालिन लक्ष्य जवळपास ३०० रुपये आहे. विट्टल म्हणाले की, ३०० रुपये एआरपीयूवर पोहचल्याशिवाय भारतीय कंपनीला १५ टक्के RoCE (रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड) प्राप्त करणे शक्य नाही. कंपनीचा आधीच टॅरिफच्या कमी प्रभावामुळे १० QoQ वरून वाढून १६३ रुपये झाला आहे. टॅरिफमधील वाढीचा परिणाम आर्थिक वर्ष २०२२ च्या अखेरीस दिसण्याची शक्यता आहे. Vodafone Idea () देखील हेच करण्याचा प्रयत्न करत आहे. विश्लेषकांनुसार, प्रीपेड टॅरिफमध्ये वाढ न करता वोडाफोन आयडियाला जास्त दिवस टिकून राहणे अवघड आहे. भारतात मोबाइल अद्यापही ऑपरेटर्ससाठी रिटर्न मिळवण्यासाठी कमी आहे. त्यामुळे २०२२ मध्ये पुन्हा एकदा कंपन्या प्रीपेड टॅरिफमध्ये वाढ करू शकतात. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/6gEzxL2
Comments
Post a Comment