स्मार्टफोनच्या किंमतीत लाँच झाले भन्नाट Smart TV, दमदार साउंडसह मिळेल २५ हजार फ्री चित्रपट

नवी दिल्ली: भारतीय कंपनी ने आपल्या रेंजचा विस्तार करत चार नवीन मॉडेल सादर केले आहेत. कंपनीने (३२ इंच) आणि Daiwa D40HDR9L (३९ इंच) या मॉडेलला सादर केले आहे. याशिवाय या टीव्हीचे दोन व्हेरिएंट Daiwa D32SM9A आणि ला देखील सादर केले आहे. या व्हेरिएंटमध्ये कंपनी वॉइस असिस्टेंट कंट्रोल्ससाठी अतिरिक्त सपोर्ट देखील ऑफर करत आहे. किंमतीबद्दल सांगायचे तर Daiwa 32SM9 ची किंमत ११,९९० रुपये, D32SM9A ची किंमत १२,४९० रुपये, D40HDR9L ची किंमत १७,९९० रुपये आणि D40HDR9LA साठी १८,४९० रुपये मोजावे लागतील. सर्व टीव्ही कंपनीची वेबसाइट आणि ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वाचा: फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स नवीन टीव्हीच्या ३२ इंचाच्या दोन्ही व्हेरिएंटमध्ये १३६६x७६८ पिक्सल रिझॉल्यूशन ३२ इंच एचडी रेडी डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले क्वांटम ल्यूमिनिट टेक्नोलॉजीसह येतो. तर ३९ इंचाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये १३६६x७६९ पिक्सल रिझॉल्यूशनसह येणारा डिस्प्ले दिला आहे. हे सर्व टीव्ही १ जीबी रॅमसह येतात. कंपनी या टीव्हींमध्ये ARM Cortex A५३ कोरसह क्वॉड-कोर प्रोसेसर देत आहे. दमदार साउंडसाठी कंपनी ३२ इंच व्हेरिएंटमध्ये २० वॉटचे सराउंड स्पीकर्स देत आहे. तर ३९ इंचाच्या दोन्ही नवीन टीव्हीत सराउंड साउंड बॉक्स स्पीकर देत आहे. कनेक्टिव्हिटीसाठी दोन्ही टीव्हीमध्ये दोन एचडीएमआय पोर्ट, दोन यूएसबी टाइप-ए पोर्ट, वाय-फाय, इथरनेट आणि एक ऑप्टिकल आउटपूट सारखे पर्याय दिले आहेत. मात्र, टीव्हीत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी मिळत नाही. कंपनी या टीव्हीमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओसह नेटफ्लिक्स, युट्यूब, डिज्नी+ हॉटस्टार, झी५ आणि सोनी लिव्ह सारख्या अनेक अ‍ॅप्सचा सपोर्ट देत आहे. खास गोष्ट म्हणजे या टीव्हीमध्ये मूव्ही बॉक्स नावाचा एक अ‍ॅप दिला आहे, ज्यात वेगवेगळ्या भाषांमध्ये २५ हजार पेक्षा अधिक मोफत चित्रपट उपलब्ध आहेत. टीव्हीसोबत येणाऱ्या रिमोटमध्ये वॉइस कमांडसाठी इनबिल्ट मायक्रोफोन दिले आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/bw0ZM8m

Comments

clue frame