नवी दिल्ली: स्टार्टअप बेस्ड रियलिटी शो सध्या प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे. या कार्यक्रमात अनेक उद्योगपती आले, त्यांनी आपल्या आयडियाने केवळ लोकांचेच नाही तर परीक्षक अर्थात शार्कचे देखील मन जिंकले. अनेकांना या कार्यक्रमाद्वारे मोठे फंडिग देखील मिळाले. Shark Tank India चे परीक्षक देखील विशेष चर्चेत आहेत. लोक या परीक्षकांचे शिक्षण, संपत्ती अशी विविध माहिती सर्च करत आहेत. यात सहभागी झालेल्या अनेक उद्योजकांनी आपल्या नवनवीन कल्पनांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले. अशीच एक १३ वर्षांची मुलगी सध्या विशेष चर्चेत आहे. या मुलीने आपल्या बिझनेस आयडियाद्वारे शार्क्सचे मन जिंकले व सोबतच ५० लाख रुपयांचा फंड देखील मिळवला आहे. ही मुलगी कोण आहे व तिची बिझनेस आयडिया नक्की आहे? याविषयी जाणून घेऊया. वाचा: गुरुग्राम येथे राहणारी १३ वर्षीय शार्क टँक इंडियामध्ये एक वेगळी आयडिया घेऊन पोहचली होती. तिने सांगितले की, ३ वर्षांपूर्वी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला होता. याचे नाव आहे. या स्क्वॉडने शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि तज्ञांच्या मदतीने १०० पेक्षा अधिक शाळा आणि विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा पोहचवला आहे. तिने या कॉन्सेप्टसाठी तयार करण्यात आलेल्या ‘कवच’ अॅपचा देखील उल्लेख केला आहे. तिची ही आयडिया कार्यक्रमाच्या परीक्षकांना देखील आवडली व तिला ५० लाख रुपयांची फडिंग मिळाली आहे. अनुष्काने आपल्या विषयी माहिती देताना सांगितले की, हे अॅप बुलिंग म्हणजेच धमाकावणे-छळ करणे इत्यादी पासून बचावासाठी मुले व विद्यार्थ्यांची मदत करेल. जर एखाद्याने त्रास दिल्यास या अॅपच्या मदतीने नाव न सांगता रिपोर्ट करता येईल. या अॅपची कल्पना कशी सुचली याबाबत तिने सांगितले की, ५ वर्षांपूर्वी तिच्या शाळेत एक कार्यक्रमात होता. यात काही इतर विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांची खिल्ली उडवली होती. या घटनेने तिचा विचार बदलला. तेव्हाच तिने असे काही तरी तयार करण्याचा विचार केला, ज्याने मदत करता येईल. तिने असे अॅप तयार केले, ज्याद्वारे बुल्लिंग संबंधीच्या घटना विद्यार्थी आणि पालक आपल्या नावाचा उल्लेख न करता रिपोर्ट करू शकतील. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/mrVPdDp
Comments
Post a Comment