नवी दिल्ली: सध्या आपला नवीन Samsung Galaxy A23 5G वर काम करत आहे. लीक रिपोर्ट्सनुसार, हा फोन भारतात ३१ मार्चला लाँच होण्याची शक्यता आहे. फोनच्या लाँचिंग तारखेबाबत अद्याप कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आता सॅमसंगच्या या अपकमिंग स्मार्टफोनबाबत नवीन रिपोर्ट समोर आला असून, यात फोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. टिप्स्टर स्टीव्ह हेम्मरस्टॉफर आणि कॉलेजदुनियानुसार सॅमसंगचा हा फोन भारतात २१,९९० रुपये किंमतीसह लाँच होईल. वाचा: ला कंपनी ब्लॅक आणि व्हाइट रंगात सादर करू शकते. रिपोर्टमध्ये शेअर करण्यात आलेल्या रेंडर्सनुसार फोनचे डिझाइन गेल्यावर्षी लाँच झालेल्या गॅलेक्सी ए सीरिजच्या स्मार्टफोन्ससारखे असेल. फोनच्या बॅक पॅनेलवर कंपनी मोठा कॅमेरा सेटअप देईल. यात एलईडी फ्लॅशसह ४ कॅमेरे असतील. तर फोनमध्ये फ्रंटला वॉटरड्रॉप नॉच डिझाइन डिस्प्लेसह थिक चिन आणि स्लिम साइड बेझल्स आहेत. सॅमसंगचा हा फोन ६.४ इंच HD IPS LCD डिस्प्लेसह येईल. या डिव्हाइसला कंपनी ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजसह लाँच करू शकते. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०० एमटी ६३३ चिपसेटचा सपोर्ट दिला जाईल. फोटोग्राफीसाठी या हँडसेटमध्ये कंपनी चार रियर कॅमेरा देऊ शकते. यामध्ये ५० मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेंसर, एक २ मेगापिक्सलचा मॅक्रो आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असेल. तर सेल्फीसाठी यात १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये कंपनी अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ऑफर करू शकते. पॉवरसाठी यामध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी देईल. तर कनेक्टिव्हिटीसाठी ५जी, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक सारखे पर्याय मिळतील. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/iGfYVkb
Comments
Post a Comment