Samsung ची बहुप्रतिक्षित सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन सीरिज Galaxy S22 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्ली: ने आज आपल्या फ्लॅगशिप Samsung S22 सीरिजला भारतात लाँच केले आहे. या फ्लॅगशिप सीरिजमध्ये Samsung Galaxy S22, Galaxy S22+ आणि Ultra चा समावेश आहे. च्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७२,९९९ रुपये आहे. तर २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७६,९९९ रुपये आहे. Samsung Galaxy S22 Plus च्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८४,९९९ रुपये आहे. तसेच, २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८८,९९९ रुपये आहे. चारही मॉडेल्समध्ये ८ जीबी रॅम दिली आहे. Samsung Galaxy S22 Plus Ultra च्या २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,०९,९९९ रुपये आहे. S22 Plus Ultra च्या ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची १,१८,९९९ रुपये आहे. या दोन्ही व्हेरिएंटमध्ये १२ जीबी रॅम मिळते. वाचा: Samsung Galaxy S22 आणि Galaxy S22+ चे स्पेसिफिकेशन्स Samsung Galaxy S22 आणि Galaxy S22+ मध्ये फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. यासोबतच, १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेंसर आणि १० मेगापिक्सल टेलिफोटो लेंस आहे. फोनमध्ये फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी १० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये Snapdragon ८ Gen १ चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. Samsung Galaxy S22 आणि Galaxy S22+ मध्ये Ultrasonic फिंगरप्रिंट सेंसर आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळतो. Samsung Galaxy S22 मध्ये ६.१ इंच एमोलेड स्क्रिन दिली आहे. तर S22 Plus मध्ये ६.६ इंच एमोलेड डिस्प्ले मिळतो. S22 मध्ये ३७०० एमएएच आणि S22+ मध्ये ४५०० एमएएचची बॅटरी मिळते, जी ४५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हे फोन्स १५ वॉट वायरलेस चार्जिंग देखील सपोर्ट करतात. फोन अँड्राइड १२ आधारित One UI ४.१ आउट ऑफ द बॉक्सवर काम करतात. चे स्पेसिफिकेशन्स Samsung स्मार्टफोन हा एस२२ सीरीजचे टॉप-एंड मॉडेल आहे. यामध्ये देखील Snapdragon ८ Gen १ प्रोसेसर दिले आहे. या फोनमध्ये ६.८ इंच QHD+ Dynamic AMOLED २X पॅनेल दिले असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि टच सँपलिंग रेट २४० हर्ट्ज आहे. Galaxy S22 Ultra मध्ये एस-पेन साठी डेडिकेटेड पॉकेट देखील दिले आहे. हँडसेट जास्त पॉवरफुल कॅमेरा सेटअपसह येतो. यामध्ये १०८ मेगापिक्सल वाइड कॅमेरा दिला आहे. सोबतच, १२ मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि १० मेगापिक्सलचे दोन टेलिफोटो लेंस मिळतात. फ्रंटला ४० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तर पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/oWJE69P

Comments

clue frame