मोठा खुलासाः Samsung Galaxy S22 सीरिजची भारतात 'इतकी' असेल किंमत, १९९९ रुपयात करा बुक

नवी दिल्ली: सीरिज गेल्या आठवड्यात गॅलेक्सी अनपॅक्ड २०२२ इव्हेंटमध्ये जागतिक बाजारात लाँच झाली आहे. आता नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात सादर केले जाण्याची शक्यता आहे. या फोन्सचे प्री-रजिस्ट्रेशन भारतात आधीच सुरू झाले आहे. अधिकृत लाँचआधी एका रिपोर्टमध्ये Galaxy S22 आणि च्या किंमतीचा खुलासा झाला आहे. यासोबतच, गॅलेक्सी २२ सीरिजच्या कलर ऑप्शनबाबत देखील डिटेल्स लीक झाली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस २२ सीरिजच्या तिन्ही स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा एमोलेड डिस्प्ले दिला आहे व एक ग्लास बॅक आहे. वाचा: एका रिपोर्टनुसार, भारतात सॅमसंग गॅलेक्सी एस२२ ची किंमत ६९,९०० रुपयांपासून सुरू होईल. गॅलेक्सी एस २२ अल्ट्रा मॉडेल हे एस पेन सपोर्टसह येते. या डिव्हाइसची सुरुवाती किंमत १,०९,९०० रुपये असण्याची शक्यता आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी एस२२+ च्या किंमतीबाबत माहिती समोर आलेली नाही. टिप्सटर इशान अग्रवाल (@ishanagarwal24) ने या फोन्सचे डिटेल्स लीक केले आहे. रिपोर्टमध्ये गॅलेक्सी एस २२ आणि गॅलेक्सी एस २२ अल्ट्रा मॉडेलचे कलर व्हेरिएंट लीक झाले आहेत. रिपोर्टनुसार, गॅलेक्सी एस२२ ला एक नवीन पिंक गोल्ड कलर व्हेरिएंट आणि गॅलेक्सी एस२२ अल्ट्राला ग्रीन कलर व्हेरिएंटमध्ये भारतीय बाजारात या वर्षाच्या अखेरीस लाँच केले जाईल. हे कलर व्हेरिएंट सध्या प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध नाहीत. सॅमसंगने गॅलेक्सी एस२२ ला ग्रीन, फँटम ब्लॅक आणि फँटम व्हाइट रंगात सादर केले जाईल. तर सॅमसंग गॅलेक्सी एस२२ अल्ट्राला बरगंडी, फँटम ब्लॅक आणि फँटम व्हाइट रंगाच्या पर्यायासह लाँच केले जाईल. फक्त १,९९९ रुपयात करू शकता गॅलेक्सी एस२२ सीरिजला बुक काही दिवसांपूर्वीच सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी एस२२ सीरिजला जागतिक बाजारात लाँच केले होते. भारतात ही फ्लॅगशिप सीरिज प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे. ग्राहक फोनला सॅमसंग इंडियाच्या वेबसाइटवर जाऊन बुक करू शकतात. सॅमसंग या फ्लॅगशिप फोनला प्री-रिझर्व्ह करण्यासाठी फक्त १,९९९ रुपये घेत आहे. विशेष म्हणजे ही रिफंडेबल अपफ्रंट किंमत आहे. प्री-रिझर्व्ह २१ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहिल. त्यामुळे तुम्ही जर सॅमसंगच्या या फ्लॅगशिप स्मार्टफोनला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फक्त १,९९९ रुपयात आताच प्री-बुक करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/RJaUV32

Comments

clue frame