Redmi च्या 'या' लेटेस्ट स्मार्टफोनवर मिळतेय बेस्ट डील, १६,५०० रुपयांपर्यंतच्या ऑफसह, १ हजाराचा इन्स्टंट डिस्काउंट

नवी दिल्ली: चा पहिला सेल सुरु झाला असून हा फोन तुम्ही कंपनीच्या वेबसाइट (mi.com) आणि Amazon India वरून खरेदी करू शकता. हा फोन ६ GB + ६४ GB, ६ GB + १२८ GB आणि ८ GB + १२८ GB या तीन प्रकारांमध्ये येतो. बेस व्हेरिएंटची किंमत १६,४९९ रुपये आहे आणि टॉप एंड व्हेरिएंटसाठी १८,४९९ रुपये मोजावे लागतील. त्याच वेळी, त्याच्या मध्यम वेरिएंटची किंमत १७,४९९ रुपये आहे. पहिल्या सेलमध्ये कंपनी या फोनवर १,००० रुपयांची इन्स्टंट सूट देखील देत आहे. या सवलतीसाठी तुम्हाला बँक ऑफ बडोदा कार्डद्वारे पैसे द्यावे लागतील. याशिवाय, एक्सचेंज ऑफरमध्ये (Mi Exchange) Redmi Note 11S फोन घेऊन तुम्हाला १६,५०० रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. Redmi Note 11S फोनमध्ये, कंपनी १०८० x २४०० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.५३ -इंच फुल एचडी + एमोलेड डॉट डिस्प्ले देत आहे. वाचा: हा डिस्प्ले ९०Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. Redmi च्या या फोनमध्ये तुम्हाला ८ GB पर्यंत रॅम आणि १२८ GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजचा पर्याय मिळेल. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये MediaTek Helio G96 चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह चार रियर कॅमेरे आहेत. यात ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल शूटर, २ मेगापिक्सेल मॅक्रो-शूटर आणि २ -मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह २०८ -मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी तुम्हाला फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या Redmi Note 11S मध्ये ५००० mAh बॅटरी आहे. ही बॅटरी ३३ W प्रो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 11 वर आधारित MIUI 13 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5.0, IR ब्लास्टर आणि ३.५ mm हेडफोन जॅकसह सर्व मानक पर्याय देण्यात आले आहेत. Redmi Note 11S सोबतच, Redmi Note 11 देखील लाँच करण्यात आला असून ड्यूल सिम सपोर्टसह येणारा Redmi Note 11 स्मार्टफोन हा अँड्राइड ११ वर आधारित MIUI १३ वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंच फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल, रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. स्क्रीन ब्राइटनेस १००० निट्स आणि आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/0JKqigs

Comments

clue frame