आज येताहेत Realme 9 Pro सीरीजचे दोन नवीन फोन्स, फोनमध्ये सुपरफास्ट चार्जिंगसह हार्ट रेट सेंसरसारखे फीचर्स,पाहा डिटेल्स
नवी दिल्ली: तुम्ही जर Realme चे फॅन असाल आणि कंपनीचा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, Realme आज, १६ फेब्रुवारी रोजी आपला पुढील फ्लॅगशिप स्मार्टफोन, Series 5G लाँच करणार आहे. मालिकेत दोन नवीन स्मार्टफोन जागतिक स्तरावर लाँच केले जातील. हे Realme 9 Pro Plus 5G आणि Realme 9 Pro 5G असेल. डिजिटल लाँच Realme च्या YouTube आणि Facebook पेजवर दुपारी १.३० वाजता प्रसारित केले जाईल. हे स्मार्टफोन प्रीमियम श्रेणीत बसतात आणि AMOLED डिस्प्लेसह येतात. सोबतच, Realme 9 Pro 5G आणि Realme 9 Pro+ 5G ची मध्ये १२० Hz रिफ्रेश रेट आणि जलद चार्जिंग सारखी वैशिष्ट्ये असतील. स्मार्टफोन्स खरेदी करायचे असतील तर त्यासाठी किती पैसे मोजावे लागतील जाणून घेऊया. वाचा: Realme 9 Pro 5G आणि Realme 9 Pro+ 5G ची किंमत: Realme 9 Pro 5G च्या रिटेल बॉक्सची किंमत १८,९९९ रुपये आहे. तर दुसरीकडे, Realme 9 Pro+ 5G ची किंमत २४,९९९ रुपये आहे. या किमती बहुधा दोन्ही फोनच्या बेस मॉडेलसाठी आहेत. रिटेल बॉक्स प्राइसिंग लीक सूचित करते की, दोन्ही फोनचे बेस व्हेरिएंट १६,९९९ रुपयांच्या कमी किंमत टॅगसह आणि 9 Pro+ 5G फोन २२,९९९ रुपयांच्या कमी किंमत टॅगसह खरेदीसाठी उपलब्ध केले जाऊ शकतात. Realme 9 Pro मध्ये ६.९५ इंचाचा IPS LCD FHD+ १२० Hz डिस्प्ले, १६ -मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि ६४ -मेगापिक्सेल (मुख्य) + ८-मेगापिक्सेल (अल्ट्रावाइड) + २-मेगापिक्सेल (मॅक्रो) ट्रिपल कॅमेरा सिस्टम आहे. स्नॅपड्रॅगन ६९५ समर्थित डिव्हाइस ४GB/ ६GB /८GB रॅम आणि १२८ GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेजसह येईल. Realme 9 Pro 5G ला ५००० mAh बॅटरीचा सपोर्ट असेल . जी ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Realme 9 Pro+ 5G चे संभाव्य तपशील: Realme 9 Pro+ मध्ये ६.४३ -इंचाचा AMOLED FHD+ ९०Hz डिस्प्ले मिळू शकते. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी यात १६ -मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आणि ५० -मेगापिक्सेल (मुख्य, OIS सह) + ८-मेगापिक्सेल (अल्ट्रावाइड) + २-मेगापिक्सेल (मॅक्रो) असेल. कॅमेरा सेटअप असेल. Pro+ Dimensity 920 समर्थित डिव्हाइस ६GB/८ GB रॅम आणि १२८ GB/ २५६ GB इनबिल्ट स्टोरेजसह येऊ शकते. Realme 9 Pro+ 5G मध्ये ६५ W जलद चार्जिंगला सपोर्ट करणारी ४५०० mAh बॅटरी असू शकते. तसेच, Realme 9 Pro+ 5G मध्ये हार्ट रेट सेन्सर आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8aEt1xU
Comments
Post a Comment