स्मार्टफोनमधून निघताहेत धोकादायक Radiation!, आजारी पडण्याची भीती वाढली, 'असं' रहा यापासून दूर

नवी दिल्ली: आपण रेडिओएक्टिव्ह रेडिएशनबद्दल ऐकले असेल. रेडिओएक्टिव्ह रेडिएशन मानवांसाठी खूप धोकादायक असून खूप मोठे नुकसान करू शकते. हे वेगळे सांगायची गरज नाही. रेडिएशनचे अनेक प्रकार असले तरी, रेडियोएक्टिव रेडिएशन हा यातील सर्वात धोकादायक मानला जातो. यामुळे मोठ-मोठे आजार देखील होऊ शकतात. या रेडिओएक्टिव्ह रेडिएशनपासून शक्य तेवढे दूर राहणे चांगले. कदाचित, तुमच्यापैकी काहींना माहित नसेल पण तुमचा स्मार्टफोन देखील रेडिएशन तयार करतो. अनेक स्मार्टफोनमध्ये हे रेडिएशन कमी आणि अनेकांमध्ये जास्त असते आणि अशा प्रकारचे प्रकारचे रेडिएशन मानवांसाठी धोकादायक ठरू शकते. आजकाल स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे युजर्सची कधी- कधी या रेडिएशन्सची थेट संपर्क येतो आणि असे झाल्यास युजर्सचे नुकसान होऊ शकते. वाचा: तुम्ही या रेडिएशनपासून स्वतःचा बचाव कसा करू शकता, त्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागेल आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहो. अँटी रेडिएशन स्मार्ट फोन कव्हर: आजकाल बाजारात अनेक प्रकारचे स्मार्टफोन कव्हर उपलब्ध आहेत. यातील काही अँटी-रेडिएशनच्या वैशिष्ट्यासह येतात. म्हणजेच या स्मार्टफोनच्या कव्हरमधून रेडिएशन बाहेर पडू शकत नाही आणि मध्येच थांबते, त्यामुळे हे रेडिएशन यूजर्सपर्यंत पोहोचत नाही. असे कव्हर्स बाजारात सहज उपलब्ध आहेत आणि त्यांची किंमत देखील सामान्य स्मार्ट फोन कव्हर सारखीच आहे. अँटी रेडिएशन स्मार्टफोन कोटिंग: आजकाल स्मार्टफोनमध्ये असे कोटिंग केले जात आहे जे रेडिएशन विरोधी आहे. या प्रक्रियेत, स्मार्टफोनच्या आजूबाजूला एक फिल्म किंवा कोटिंग लावले जाते, जे रेडिएशन रोखते आणि वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यापासून प्रतिबंधित करते. जे किरणोत्सर्ग अतिशय घातक ठरू शकते, त्यामुळे या कोटिंग चा वापर आगामी काळात वाढण्याची अपेक्षा आहे. या रेडिएशन थांबवण्याच्या पद्धती कितपत प्रभावी आहे याचा अंदाज ते वापरल्यानंतर युजर्स घेऊ शकतात. स्मार्टफोन्समुळे आयुष्य जरी सुलभ आणि सोप्पे झाले असले तरी त्यातील सारख्या काही गोष्टी युजर्ससाठी धोकादायक ठरू शकतात. यामुळे नुकसान होऊ नये याकरिता युजर्सने वेळीच योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे वाचा: वाचा: वाचा


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ulJK1yd

Comments

clue frame