Poco M4 Pro 5G चा पहिला सेल आज, खरेदीवर मिळणार जबरदस्त ऑफर, पाहा फीचर्स

नवी दिल्ली: स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात लाँच झाला होता. या फोनचा पहिला सेल आज, मंगळवारी (२२ फेब्रुवारी) रोजी आयोजित करण्यात आला आहे. ग्राहक Poco M4 Pro 5G फोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरून दुपारी १२ वाजता खरेदी करू शकतील. या मिड-रेंज फोनमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. Poco M4 Pro 5G चा कॅमेरा देखील युजर्सना आवडेल असाच आहे. यात प्रामुख्याने ५० -मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा, मीडियाटेक डायमेंसिटी 810 प्रोसेसर आणि ८ GB पर्यंत रॅम सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. फोनमध्ये टर्बो रॅम क्षमता देण्यात आली आहे. जी ८ GB रॅम ते ११ GB पर्यंत वाढते. Poco M4 Pro 5G भारतात १४,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. ही किंमत ४ GB + ६४ GB व्हेरिएंटची आहे. वाचा: तर, Poco M4 Pro 5G च्या ६GB + १२८ GB व्हर्जनची किंमत १६,९९९ रुपये आणि ८ GB + १२८ GB व्हर्जनची किंमत १८,९९९ रुपये आहे. कंपनी सेलच्या पहिल्या दिवशी SBI डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर १००० रुपयांची सूट देत आहे. म्हणजेच तुम्ही लेटेस्ट Poco M4 Pro 5G १३,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. डिव्हाइस पॉवर ब्लॅक, कूल ब्लू आणि पोको यलो या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे.Poco M4 Pro 5G ड्युअल 5G सिम तसेच ६ nm प्रोसेस्ड ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 810 चिपसेट सपोर्टसह येतो. फोनला Mali G57 सपोर्ट आहे.Poco M4 Pro 5G Android 11 आधारित MIUI 12.5 वर काम करेल. फोनमध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. फोनचा स्क्रीन रिफ्रेश दर ९० Hz आहे. फोनचा टच सॅम्पलिंग रेट २४० Hz असेल, तर फोनला UFS2.2 स्टोरेज सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन टर्बो रॅम सपोर्टसह येईल. फोन DCI-P3 वाइड कलर गॉट आणि OG डिझाइनसह येतो. Poco M4 Pro 5G ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. त्याचा मुख्य कॅमेरा ५० MP आहे. तसेच ८ MP अल्ट्रा वाईड कॅमेरा देण्यात आला आहे.सेल्फीसाठी १६ एमपी फ्रंट कॅमेरा आहे. फोनला लवकरच MIUI 13 अपडेट दिले जाईल. Poco M4 Pro 5G 8GB LPDDR4X रॅम आणि १२८ GB UFS २.२ स्टोरेज सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/tD8ndpx

Comments

clue frame