नवी दिल्ली: तुमचा डेटा काम संपण्यापूर्वी संपला किंवा इंटरनेट वापरत असताना, तुमचा डेटा संपण्याची भीती तुम्हाला वाटत असेल, तर Vi चा हा स्वस्त प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो . खरं तर, Vodafone Idea (Vi) ही भारतातील एकमेव टेलिकॉम ऑपरेटर आहे, जी आपल्या युजर्सना असा पोस्टपेड प्लान ऑफर करते, ज्यामध्ये त्यांना मोबाइल डेटा संपण्याची चिंता करण्याची गरज नाही. Vi चा हा पोस्टपेड प्लान उद्योगातील सर्वोत्तम प्लान्सपैकी एक म्हणता येईल. कारण, इतर कोणतीही कंपनी असे प्लान्स देत नाही. आज आम्ही तुम्हाला Vi च्या एका खास पोस्टपेड प्लानबद्दल सांगणार आहोत. ज्यात प्लानसह, युजर्सना खरोखर अनलिमिटेड डेटा मिळतो आणि तो तुमच्या ब्रॉडबँड प्लानपेक्षा महाग देखील नाही. Vodafone-Idea कडे असे अनेक प्लान्स आहेत. परंतु, आम्ही येथे फक्त सर्वात स्वस्त प्लानबद्दल सविस्तर माहिती देणार आहो. वाचा: Vi चा ६९९ रुपयांचा प्लान हा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लानपैकी एक आहे. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड डेटासह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. विशेष बाब म्हणजे, या प्लानमध्ये डेटावर कोणतीही FUP मर्यादा नाही, म्हणजेच तुम्हाला पाहिजे तेवढा डेटा वापरू शकता. पण, यामध्ये एकच समस्या आहे आणि ती म्हणजे तुम्हाला संपूर्ण महिन्यासाठी फक्त १०० एसएमएस मिळतात. काही लोकांना एसएमएस कमी वाटू शकतात. परंतु, जर एसएमएस तुमच्यासाठी महत्त्वाचे नसतील आणि त्याऐवजी अधिक डेटा ही तुमची प्राथमिकता असेल, तर हा प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. प्लानमध्ये काही ओव्हर-द-टॉप (OTT) फायदे देखील समाविष्ट आहेत. जसे की Amazon Prime चे मोफत एक वर्षाचे सबस्क्रिप्शन, ज्याची किंमत साधारणपणे १,४९९ रुपये आहे. याशिवाय, युजर्सना डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन सुद्धा मोफत मिळते. या व्यतिरिक्त, ग्राहकाला या प्लानमध्ये Vi च्या स्वतःच्या OTT प्लॅटफॉर्म Vi Movies आणि TV वर देखील प्रवेश मिळतो. वर नमूद केल्याप्रमाणे, ही कंपनीची एकमेव योजना नाही जी युजर्सना खरोखर अनलिमिटेड डेटा ऑफर करते. Vi कडे अनेक प्लान्स आहेत, परंतु त्या सर्वांपैकी, ६९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन हा सर्वात परवडणारा आहे, जो प्रत्यक्षात अनलिमिटेड डेटा ऑफर करतो. इतर सर्व प्लान्स REDX श्रेणी अंतर्गत येतात आणि त्यांची किंमत दरमहा किमान १,००० रुपयांपेक्षा जास्त आहे. Vi ची REDX पोस्टपेड योजना वापरण्याचे वेगळे फायदे आहेत. REDX योजनेसह, युजर्सना मिळू शकणार्या फायद्यांची संख्या देशातील इतर कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरने ऑफर केलेल्या फायद्यांपेक्षा जास्त आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Ov0WoxD
Comments
Post a Comment