नवी दिल्ली: ने आपली नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज जगभरात लाँच केली असून कंपनीने तीन नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Oppo Find X5, Find X5 Pro आणि Find X5 Lite सादर केले आहेत. नावाप्रमाणेच, Find X5 Pro हा दोन मॉडेलमधील अधिक प्रीमियम आहे. डिव्हाइस स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसरसह येतो. X5 Lite हा या मालिकेत बजेट पर्याय म्हणून लाँच करण्यात आला आहे. इव्हेंटमध्ये प्रीमियम इयरबड देखील लाँच करण्यात आले. Oppo चे नवीन फ्लॅगशिप Android स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतात. फोनमध्ये LTPO डिस्प्ले आहे. Pro मॉडेल नवीन LTPO 2.0 तंत्रज्ञानावर चालतो. Oppo ने जागतिक बाजारपेठेसाठी Find X5 मालिका लाँच केली आहे. कंपनी या वर्षाच्या शेवटी भारतात आपली फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज लाँच करू शकते. कंपनीने मात्र याबाबत अद्याप अधिकृत लाँच तारीख सांगितलेली नाही. वाचा: जागतिक बाजारपेठेसाठी, Oppo ने ग्लेज ब्लॅक आणि सिरॅमिक व्हाईट रंगांमध्ये Find X5 Pro लाँच केला आहे. कंपनीने हे एकाच १२GB + २५६ GB व्हेरिएंटमध्ये लाँच केला असून त्याची किंमत EUR १,२९९ (अंदाजे १,१०,००० रुपये) आहे. Vanilla Find X5 ची किंमत EUR ९९९ (अंदाजे ८४,५०० ) आहे. कंपनीने हे डिव्हाइस सिंगल ८ GB + २५६ GB व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. डिव्हाइस समान सिरॅमिक व्हाइट आणि ग्लेझ ब्लॅक रंगांमध्ये देखील येते. कंपनीने अद्याप Find X5 Lite ची किंमत जाहीर केलेली नाही. हे मॉडेल स्टारलाईट ब्लॅक आणि ब्लू रंगात उपलब्ध असेल. Find X5 Pro डिवाइस QHD + रिझोल्यूशन सह ६.७ -इंचाचा सुपर AMOLED वक्र डिस्प्ले सह येतो. फास्ट चार्जिंग आणि ५० W AirVOOC वायरलेस चार्जिंगसह ५००० mAh बॅटरी पॅक करतो. Find X5 : Oppo ने ६.५५ -इंच फुल HD+ AMOLED डिस्प्लेसह Vanilla Find X5 देखील लाँच केला आहे. यात १२० Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. फोन स्नॅपड्रॅगन८८८ SoC सह येतो आणि २५६ GB इंटर्नल स्टोरेजसह ८ GB रॅम आहे. Find X5 Lite फोन Android 11 वर ColorOS 12 वर काम करतो. फोनमध्ये ६.४३ इंच फुल-एचडी AMOLED डिस्प्ले आहे. जो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ द्वारे संरक्षित आहे. फोन ८ GB LPDDR4X RAM सह जोडलेल्या ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ९०० चिपसेटसह सुसज्ज आहे. Oppo Enco X2 TWS Earbuds देखील लाँच: इव्हेंटमध्ये, कंपनीने स्मार्टफोनसोबत Oppo Enco X2 TWS इयरबड्स देखील लाँच केले. हे इअरबड्स कंपनीच्या Oppo Enco X True Wireless Stereo (TWS) इयरबड्सचे उत्तराधिकारी आहेत. वायरलेस इअरबड्स सुपरडीबीईई कोएक्सियल ड्युअल ड्रायव्हर सिस्टीमसह सुसज्ज आहेत आणि उच्च-रिझोल्यूशन ऑडिओ स्ट्रीमिंगसाठी LHDC 4.0 कोडेकसाठी वैशिष्ट्य समर्थन आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/dYWR1uO
Comments
Post a Comment