OnePlus करणार धमाका! आज भारतात लाँच करणार स्वस्तात मस्त स्मार्टफोन आणि टीव्ही, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : आज भारतात आपला नवीन Nord CE 2 5G आणि सीरिज स्मार्ट टीव्हीला लाँच करणार आहे. वनप्लसद्वारे शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, अपकमिंग स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन ९०० SoC चा सपोर्ट दिला जाईल. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. यासोबतच, वाय-सीरिज अंतर्गत दोन स्वस्त मॉडेल देखील लाँच केले जातील. लाँचआधी या वनप्लसच्या स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टफोनची काही माहिती समोर आली आहे. या दोन्ही डिव्हाइसच्या किंमत, फीचरविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: आणि OnePlus TV लाइव्ह स्ट्रीम डिटेल्स OnePlus आज संध्याकाळी ७ वाजता OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन, OnePlus TV Y1S आणि स्मार्ट टीव्ही मॉडेलला लाँच करण्यासाठी एक व्हर्च्युअल इव्हेंटचे आयोजन करणार आहे. या इव्हेंटला वनप्लस इंडियाच्या युट्यूब चॅनेल आणि कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीम केले जाईल. येथे इतर यूजर्स देखील या प्रोडक्ट्सचे लाँचिंग पाहू शकतील. तसेच, OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge चे संभाव्य फीचर्स देखील समोर आले आहेत. OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge ला ३२ इंच आणि ४३ इंच डिस्प्ले साइजमध्ये लाँच केले जाऊ शकते. कंपनीने खुलासा केला आहे की, स्मार्ट टीव्हीमध्ये बेझल लेस डिझाइन असेल. वनप्लसच्या वेबसाइटनुसार, OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge दोन्हीमध्ये शानदार डिटेलसह गामा इंजिन असेल व हे गेमिंग दरम्यान ऑटो लो लेटेंसी मोड देखील मिळेल. हे टीव्ही अँड्राइड टीव्ही ११ वर काम करतील. OnePlus Nord CE 2 5G ची संभाव्य किंमत आणि स्पेसिफिकेशन्स आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, अपकमिंग OnePlus Nord CE 2 5G च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २३,९९९ रुपये असेल. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २५,९९९ रुपये असू शकते. OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोनला बहामा ब्लू आणि ग्रे मिरर रंगात सादर केले जाईल. या स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता असून, हा ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट, एचडीआर १० प्लस सपोर्ट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह येते. वनप्लस नॉर्ड सीई २ ५जी मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यामध्ये ६४ मेगापिक्सल प्रायमरी रियर कॅमेरा सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि एक २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. स्मार्टफोनमध्ये फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोनमध्ये ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची दमदार बॅटरी दिली जाईल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/1YRvGQI

Comments

clue frame