आता प्रत्येक घरात असेल स्मार्ट टीव्ही, One Plus ने खूपच कमी किमतीत लाँच केले २ मॉडेल्स, फीचर्स देतील थिएटरचा फिल

नवी दिल्ली: OnePlus ने स्वस्त नवीन स्मार्ट टीव्ही मॉडेल्स देखील लाँच केले आहे. कंपनीने भारतात OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge हे दोन स्मार्ट टीव्ही मॉडेल सादर केले असून दोन्ही नवीन स्मार्ट टीव्ही ३२ इंच आणि ४३ इंच अशा दोन आकारात सादर केले गेले आहेत. व्हॅनिला OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge ला HDR10+, HDR10 आणि HLG फॉरमॅटसाठी सपोर्ट मिळतो. Tv Android TV 11 वर काम करतात आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह येतात. OnePlus TV Y1S मध्ये २० W पूर्ण-श्रेणीचे स्टीरिओ स्पीकर आहेत. तर, OnePlus TV Y1S Edge ला २४ W पूर्ण-श्रेणीचे स्टीरिओ स्पीकर. OnePlus च्या स्मार्ट टीव्हीला ऑटो लो लेटन्सी मोड (ALLM) मिळतो, ज्याचा कंपनीचा दावा आहे की, गेमिंग अनुभव सुधारतो. OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge हे दोन्ही Android TV 11 वर काम करतात . वाचा: TV मध्ये ३२ इंच आणि ४३ इंच आकारमानाचे डिस्प्ले उपलब्ध आहेत. Y1S मॉडेलमध्ये HD रिझोल्यूशन आहे. तर, Y1S Edge फुल-एचडी रिझोल्यूशन देते. HDR10, HDR10+, HLG फॉरमॅट सपोर्ट दोन्ही स्मार्ट टीव्हीमध्ये उपलब्ध आहे. OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge ला ALLM मिळाला आहे. स्मार्ट टीव्हीयामध्ये गुगल असिस्टंट सपोर्ट देखील आहे. स्मार्ट मॅनेजर वापरून, युजर्स स्मार्ट टीव्हीची अनेक काम नियंत्रित करू शकतात. कनेक्टिव्हिटीसाठी, OnePlus TV Y1S मालिका 5GHz बँड सपोर्टसह ड्युअल-बँड वाय-फाय ऑफर करत आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ सपोर्ट उपलब्ध आहे. OnePlus TV Y1S मॉडेलला 20W पूर्ण-श्रेणीचे स्टीरिओ स्पीकर मिळतात, तर OnePlus TV Y1S Edge मॉडेलला 24W पूर्ण-श्रेणीचे स्टीरिओ स्पीकर मिळतात. दोन्ही स्मार्ट टीव्हींना OxygenPlay 2.0 मिळतो. जो सामग्री एकत्रीकरण प्लॅटफॉर्म म्हणून काम करतो आणि 230 हून अधिक थेट चॅनेल ऑफर करतो. दोन्ही मॉडेल्सची किंमत: OnePlus TV Y1S ३२ -इंच मॉडेलची किंमत १६,४९९ रुपये आहे. तर, त्याच्या ४३ -इंच मॉडेलची किंमत २६,९९९ रुपये आहे. दुसरीकडे, OnePlus TV Y1S Edge ३२ इंच मॉडेलची किंमत १६,९९९ रुपये आहे तर त्याच्या ४३ -इंच मॉडेलची किंमत २७,९९९ रुपये आहे. Y1S मॉडेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, Amazon, Flipkart आणि प्रमुख ऑफलाइन रिटेलर विक्रेत्यांकडून खरेदीसाठी उपलब्ध असेल. Y1S Edge मॉडेल ऑफलाइन खरेदीसाठी फक्त अधिकृत OnePlus Store आणि प्रमुख किरकोळ विक्रेत्यांकडून उपलब्ध असेल. OnePlus चे दोन्ही स्मार्ट टीव्ही २१ फेब्रुवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. OnePlus Red केबल क्लब सदस्यांना OnePlus TV Y1S आणि OnePlus TV Y1S Edge च्या ३२ -इंच व्हेरिएंटवर ५०० रुपयांची सूट मिळत आहे. तर, OnePlus TV Y1S Edge चे ४३ इंच व्हेरियंट ७५० रुपयांच्या सूटसह ऑफर केले जात आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/KbTjIhR

Comments

clue frame