Nokia Go Earbuds 2+ आणि Nokia Go Earbuds 2 Pro लाँच, पाहा डिव्हाइसेसमध्ये काय आहे खास

नवी दिल्ली: नामंकित कंपनी नोकियाने ग्राहकांसाठी नुकतेच काही जबरदस्त डिव्हाइसेस बाजारात आणले आहे. कंपनीने Nokia Go Earbuds 2+ आणि Pro True Wireless Stereo (TWS) इयरफोन जागतिक स्तरावर लाँच करण्यात आले आहेत. तुम्हालाही नवीन इयरबड्स खरेदी करायचे तर, Nokia Go Earbuds 2+ आणि तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतात. यामध्ये १० मिमी ड्रायव्हर देण्यात आले आहे. तसेच, हे डिव्हाइस २४ तासांच्या बॅटरीलाईफसह येतात. हे इयरफोनला अतिरिक्त बास देण्यास मदत करते. Nokia Go Earbuds 2+ आणि Nokia Go Earbuds 2 Pro मध्ये पर्यावरणीय आवाज रद्द करण्याचे वैशिष्ट्य देखील प्रदान केले आहे. नोकियाचे दोन्ही TWS इयरफोन हे घाम आणि स्प्लॅश प्रतिरोधकांसाठी IPX4 रेट केलेले आहेत. या दोन्हीची किंमत कंपनीच्या वेबसाइटवर सूचीबद्ध केलेली नाही. चला तर मग जाणून घेऊया त्यांची वैशिष्ट्ये. वाचा: Nokia Go Earbuds 2+, Nokia Go Earbuds 2 Pro ची वैशिष्ट्ये: युजर्सना आवडतील त्यांच्या कामी येतील अशी काही भन्नाट फीचर्स Nokia Go Earbuds 2+ आणि Nokia Go Earbuds 2 Pro मध्ये देण्यात आली आहे. Nokia Go Earआणि buds 2+ आणि Nokia Go Earbuds 2 Pro मध्ये १० mm निओडीमियम ड्रायव्हर्स आहेत जे अतिरिक्त बास देण्यासाठी ओळखले जातात. या दोन्हींना वेगवेगळ्या उपकरणांशी जोडण्यासाठी ब्लूटूथ v5.2 देण्यात आला आहे. यासोबतच अँड्रॉईड उपकरणांशी झटपट कनेक्ट करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. Nokia TWS इयरफोन्सना पर्यावरणीय आवाज रद्दीकरण (ENC) मिळते जे युजर्सना कॉलसह पार्श्वभूमी आवाज ऐकण्यास मदत करते. नोकियाचा दावा आहे की, Nokia Go Earbuds 2+ आणि Nokia Go Earbuds 2 Pro दोन्ही ३०० mAh बॅटरीवर चालणाऱ्या चार्जिंग केससह २४ तास टिकू शकतात. प्रत्येक इयरबडमध्ये ४० mAh बॅटरी देण्यात आली आहे. TWS इयरफोन १.५ तासांत पूर्ण चार्ज होऊ शकतात. USB Type-C पोर्ट वापरून चार्जिंग केस दोन तासांत पूर्ण चार्ज होऊ शकतो. दोन्ही इयरफोन्सना स्वेट आणि स्प्लॅश रेझिस्टन्ससाठी IPX4 रेटिंग मिळाली आहे. Nokia Go Earbuds 2+ आणि Nokia Go Earbuds 2 Pro च्या इअरबड्सची परिमाणे ३५.५x१८.५x२२ mm आहेत आणि प्रत्येकाचे वजन ४.३ ग्रॅम आहे. त्याची चार्जिंग केस २८ x५२x६०mm आहे आणि वजन ४८ ग्रॅम आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/OKnXh7y

Comments

clue frame