नवी दिल्ली: इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मोठी मागणी पाहता इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर्स ब्रॉडबँड प्लान्समध्ये वाढ करत आहे. कंपनी कमी किंमतीत येणाऱ्या ब्रॉडबँड प्लान्समध्ये जास्त फायदे देत आहे. मोबाइल रिचार्जप्रमाणेच आता ब्रॉडबँड प्लान्समध्ये देखील कंपन्या अतिरिक्त बेनिफिट्स देत आहेत. टेलिकॉम कंपनी देखील आपल्या ग्राहकांना स्वस्त उपलब्ध करत आहे. मात्र, जिओला आपल्या ब्रॉडबँड प्लान्सद्वारे जोरदार टक्कर देत आहे. दोन्ही कंपन्यांकडे १०० एमबीपीएसच्या स्पीडसह येणारे प्लान्स उपलब्ध आहेत. या दोन्ही प्लान्सची तुलना करून, तुमच्यासाठी कोणता बेस्ट आहे ते जाणून घेऊया. वाचा: Excitel चे १०० एमबीपीएस प्लान Excitel ब्रॉडबँड प्लान एक महिने, तीन महिने, चार महिने, सहा महिने, ९ महिने आणि १ वर्षाच्या वैधतेसह येतात. या प्लान्सची किंमत ३९९ रुपयांपासून ते ६९९ रुपये आहे. ६९९ रुपयांच्या प्लानमध्ये ३० दिवसांच्या वैधतेसह १०० एमबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. तसेच, कंपनी कोणतेही इंस्टॉलेशन चार्ज घेत नाही. मात्र, यूजर्सला ONU डिव्हाइससाठी (modem) २ हजार रुपये डिपॉजिट द्यावे लागते. Excitel च्या १०० एमबीपीएस प्लानमध्ये तीन महिन्यांसाठी ५६५ रुपये/महिना, चार महिन्यांसाठी ५०८ रुपये/महिना, सहा महिन्यांसाठी ४९० रुपये/महिना, नऊ महिन्यांसाठी ४२४ रुपये/महिना आणि १२ महिन्यांसाठी ३९९ रुपये/महिना खर्च येईल. तसेच, ९ महिन्यांचा प्लान हा केवळ नवीन ग्राहकांसाठी आहे. चा १०० एमबीपीएस प्लान एक्साइटलप्रमाणेच JioFiber १०० एमबीपीएसच्या स्पीडसह ६९९ रुपयांचा मासिक प्लान ऑफर करते. हा प्लान मोफत वॉइस कॉलिंगसह येतो. जिओफायबरच्या तीन महिन्यांच्या प्लानची किंमत २०९७ रुपये आहे. तसेच, जिओफायबरचा ६ महिन्यांचा प्लान ४,१९४ रुपयात येतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि १५ दिवसांची अतिरिक्त वैधता (१८० दिवस) मिळते. जिओच्या १०० Mbps स्पीडसह येणाऱ्या वार्षिक प्लानसाठी ८,३८८ रुपये खर्च करावे लागतील. यात एक महिन्याची अतिरिक्त वैधता आणि मोफत कॉलिंगची सुविधा मिळते. Excitel vs Jio १०० Mbps प्लान Jio आणि Excitel ६९९ रुपयात १०० Mbps स्पीडसह येणारा प्लान ऑफर करतात. Excitel ब्रॉडबँड प्लानचा एक फायदा म्हणजे जर यूजर्सने जास्त कालावधीसाठी प्लान घेतल्यास महिन्याचा खर्च कमी होतो. कंपनी एक वर्षाच्या वैधतेसह १०० एमबीपीएस स्पीडसह ३९९ रुपयांचा प्लान ऑफर करते. यात अनलिमिटेड डेटा मिळतो. म्हणजेच, वर्षभरासाठी ४,७८८ रुपये खर्च येईल. तर जिओच्या वर्षभराच्या प्लानची वैधता ८,३८८ रुपये आहे. मात्र, Excitel तुमच्या भागात सेवा प्रदान करते की नाही, हे तुम्हाला पाहावे लागेल. तर पॅन-इंडिया प्रोव्हाइडर आहे. वाचा: वाचा: वाचा
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/LkmxTK8
Comments
Post a Comment