Jio चा जबरदस्त प्लान! फक्त २९६ रुपयांच्या रिचार्जमध्ये कोणत्याही लिमिटशिवाय वापरा डेटा, मोफत कॉलिंगचाही फायदा
नवी दिल्ली: टेलिकॉम कंपनी ने टॅरिफ हाइकनंतर आपल्या रिचार्ज प्लानमध्ये अनेक बदल केले आहेत. कंपनीकडे इतर प्रतिस्पर्धी टेलिकॉम कंपन्या भारती एअरटेल, बीएसएनएल आणि वोडाफोन आयडियाच्या तुलनेत अनेक स्वस्त प्लान्स उपलब्ध आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कडे एक असाच प्लान उपलब्ध आहे, ज्यात यूजर्स कोणत्याही लिमिटशिवाय इंटरनेट वापरू शकतात. तसेच, अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा या प्लानमध्ये मिळते. तुम्ही जर कोणत्याही लिमिटशिवाय जास्त डेटा वापरत असाल तर हा प्लान तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. वाचा: रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये तुम्ही कितीही डेटा वापरू शकता. म्हणजेच, दररोज किती डेटा वापरायचा यावर कोणतीही मर्यादा नाही. याशिवाय, कंपनीचा हा एकमेव असा प्लान आहे, जो संपूर्ण महिनाभर म्हणजेच ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. जिओच्या या प्लानची किंमत ३०० रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज मोफत एसएमएसची देखील सुविधा मिळेल. जिओच्या या स्वस्त प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया. Jio चा २९६ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओचा २९६ रुपयांचा हा रिचार्ज जिओच्या कॅटेगरीमध्ये येतो. या प्लानमध्ये एकूण २५ जीबी डेटा मिळतो. या प्लानचे वैशिष्ट्ये म्हणजे यात दररोज कितीही डेटा वापरू शकता. म्हणजेच, तुम्ही एकाच दिवशी प्लानमध्ये मिळणार संपूर्ण २५ जीबी डेटा देखील वापरू शकता. नो डेली डेटा लिमिटसह येणारा हा जिओचा एकमेव प्लान आहे. जिओच्या २९६ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची देखील सुविधा मिळते. याशिवाय प्लानमध्ये दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा दिली जात आहे. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यामध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि JioCloud सारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/MykboY8
Comments
Post a Comment