कमी डेटा वापरणाऱ्यांपासून ते हेवी इंटरनेट युजर्सपर्यंत Jioचे 'हे' प्लान्स आहेत प्रत्येकासाठी परफेक्ट
नवी दिल्ली: ने नवीन प्रीपेड रिचार्ज किमतींबद्दल माहिती दिली असून या दूरसंचार कंपनीने १ डिसेंबर २०२१ रोजी आपल्या नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान्स घोषणा केली होती . Reliance ने सर्व प्लान्ससाठी नवीन रिचार्जच्या किमती सुमारे २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. रिलायन्स जिओ १४ दिवसांपासून ते पूर्ण ३६५ दिवसांपर्यंतचे प्लान्स ऑफर करते. Airtel आणि Vodafone Idea या दोन्ही कंपन्यांच्या प्लानच्या किमती वाढल्यानंतर जिओच्या प्लान्सच्या किमती वाढवण्यात आल्या म्हणूनच, २०२२ मध्ये सर्वात लोकप्रिय Jio प्रीपेड रिचार्ज प्लान्स कोणते आहे आणि तुम्हाला त्यांच्यासाठी कोणते रिचार्ज करावे लागेल,आणि मुख्य म्हणजे तुम्हाला यात कोणते बेनिफिट्स मिळतील हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. आज आम्ही अशाच Jio प्रीपेड रिचार्ज प्लान्सची यादी घेऊन आलो आहोत. पाहा डिटेल्स आणि निवड करा सर्वत बेस्ट प्लानची. वाचा: रिलायन्स जिओ प्रीपेड प्लानमध्ये बंपर फायद्यांसह एक प्लान आहे. रिलायन्स जिओचा हा प्लान अशा लोकांसाठी चांगला आहे ज्यांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये वायफाय आहे आणि जे मोबाईल डेटा जास्त वापरत नाहीत. यासाठी Reliance Jio १ GB प्रति दिवस प्रीपेड रिचार्ज प्लानची निवड करावी. या वैधता २८ दिवसांची आहे आणि त्याची किंमत २०९ रुपये आहे. या यादीतील दुसरी योजना देखील खूप चांगली आहे. तुमच्याकडे जास्त सोशल मीडिया तपासणे, व्हॉट्सअॅपचे फोटो-व्हिडिओ डाउनलोड करणे किंवा यूट्यूबवर व्हिडिओ पाहणे असे काम असेल, तर हा प्लान तुमच्यासाठी योग्य आहे. यामध्ये तुम्हाला दररोज १.५ GB डेटा दिला जातो. या प्लानची किंमत २३९ रुपये आहे आणि त्याची वैधता २८ दिवस आहे. त्याच वेळी, तुम्ही समान फायद्यांसह ८४ दिवसांच्या वैधतेसह प्लान देखील घेऊ शकता, ज्याची किंमत ६६६ रुपये आहे. हेवी इंटरनेट वापरकर्ते श्रेणीमध्ये समाविष्ट केलेले प्लान्स अशा वापरकर्त्यांसाठी आहे. ज्यांना Instagram रील्स, Facebook व्हिडिओ, YouTube व्हिडिओ किंवा Netflix आणि Hotstar चित्रपट किंवा शो पाहणे अधिक आवडते. यासाठी, Reliance Jio प्रीपेड रिचार्ज प्लान २ GB प्रतिदिन योग्य असेल. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानची किंमत २९९ रुपये आहे. जर तुमचे बजेट थोडे जास्त असेल, तर तुम्ही ८४ दिवसांच्या वैधतेच्या प्लानसाठी जावे ज्याची किंमत ७१९ रुपये आहे. आणखी एक प्लान आहे. जो ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. त्याची किंमत १,०६६ रुपये आहे. यामध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन रिचार्जच्या कालावधीसाठी दिले जात आहे. तुम्हाला Disney+ Hotstar कन्टेन्ट पाहायचा असल्यास, तुम्ही दुसरा प्लान देखील निवडू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/aJpU47N
Comments
Post a Comment