Jio-Vi मध्ये ‘या’ सर्वात स्वस्त प्लानवरून जोरदार टक्कर, समान किंमतीत मिळतायत वेगवेगळे बेनिफिट्स

नवी दिल्ली: टेलिकॉम कंपन्या आणि वोडाफोन आयडियाकडे आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही कंपन्या कमी किंमतीत जास्त फायदे देण्याचा प्रयत्न करत असतात. दोन्ही कंपन्यांकडे काही प्लान्स असे देखील आहेत, ज्यांची किंमत तर समान आहे, मात्र यात मिळणारे बेनिफिट्स वेगवेगळे आहेत. त्यामुळे ग्राहकांना देखील कोणत्या कंपनीचा रिचार्ज करावा असा प्रश्न पडतो. Reliance आणि कडे असाच समान किंमतीत येणारा १४९ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये मिळणारे फायदे वेगवेगळे आहेत. या दोन्ही प्लान्सची तुलना करून, तुमच्यासाठी कोणता बेस्ट आहे जाणून घेऊया. वाचा: Jio चा १४९ रुपयांचा प्लान टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे १४९ रुपयांच्या वैधतेसह येणारा शानदार प्लान उपलब्ध आहे. १४९ रुपयांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानची वैधता २० दिवस असून, कंपनी ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा देत आहे. अशाप्रकारे ग्राहकांना प्लानमध्ये एकूण २० जीबी डेटा मिळेल. याशिवाय देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळते. तसेच, दररोज १०० मोफत एसएमएस दिले जात आहे. या प्लानमध्ये Jio TV, JioCinema, Jio Security आणि JioCloud सारख्या जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. Vodafone Idea चा १४९ रुपयांचा प्लान टेलिकॉम कंपनी Vodafone Idea कडे १४९ रुपयांच्या किंमतीत येणारा प्लान उपलब्ध आहे. वीआयच्या या प्लानची वैधता २१ दिवस आहे. या प्लानमध्ये यूजर्सला संपूर्ण कालावधीसाठी एकूण १ जीबी डेटा मिळतो. याशिवाय प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळते. वीआयच्या या प्लानमध्ये मोफत एसएमएस मात्र मिळत नाही. आणि जिओचे प्लान्स समान किंमतीत येत असले तरीही यात मिळणारे बेनिफिट्स मात्र वेगवेगळे आहे. कोणाचा प्लान बेस्ट? वोडाफोन आयडिया आणि जिओच्या १४९ रुपयांच्या प्लान्समध्ये कोणाचा प्लान बेस्ट आहे हे ठरवणे अवघड आहे. कारण दोन्ही प्लान्समध्ये जवळपास समानच वैधता मिळते. वीआयच्या प्लानमध्ये जिओच्या तुलनेत १ दिवस जास्त वैधता मिळत आहे. मात्र, वीआयच्या प्लानमध्ये कोणतेही एसएमएस बेनिफिट्स मिळत नाहीत. तर जिओच्या प्लानमध्ये दररोज १०० मोफत एसएमएस मिळतात. याशिवाय जिओच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. तर वीआयच्या प्लानमध्ये संपूर्ण कालावधीसाठी १ जीबी डेटा दिला जात आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार, यापैकी एक प्लान निवडू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/nveEMu4

Comments

clue frame