Jio-Airtel ला विसरा! 'ही' कंपनी देतेय ११० दिवसांसाठी तब्बल २२० जीबी डेटा, पाहा ‘हा’ भन्नाट प्लान

नवी दिल्ली: खासगी टेलिकॉम कंपनी , आणि वोडाफोन आयडियाने गेल्यावर्षीच्या अखेरीस प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवत ग्राहकांना मोठा झटका दिला होता. केवळ सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या प्लान्सच्या किंमतीत वाढ केली नव्हती. बीएसएनएलकडे इतर कंपन्यांच्या तुलनेत अनेक स्वस्त प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्सद्वारे कंपनी , आणि ला जोरदार टक्कर देत ग्राहकांना आकर्षित करत आहे. बीएसएनएलकडे ११० दिवसांच्या वैधतेसह येणारा असाच एक शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये यूजर्सला २२० जीबी डेटा मिळत आहे. या प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: चा ६६६ रुपयांचा प्रीपेड प्लान सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे ६६६ रुपयांच्या किंमतीत येणारा शानदार प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. ६६६ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला ११० दिवसांची वैधता दिली जात आहे. या प्लानमध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण २२० जीबी डेटा मिळतो. तसेच, डेली डेटा समाप्त झाल्यानंतर यूजर्स ४० Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकतात. प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळते. तसेच, दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतील. या प्लानमध्ये फ्री कॉलरट्यून्स आणि लोकधुन कॉन्टेंटची मेंबरशिप दिली जात आहे. Jio, वीआय आणि एअरटेलचे प्लान्स रिलायन्स जिओकडे ६६६ रुपयांच्या किंमतीत येणारा शानदार प्लान उपलब्ध आहे. ८४ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी दररोज १.५ जीबी डेटा देत आहे. अशाप्रकारे प्लानमध्ये एकूण १२६ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. एअरटेल आणि वोडाफोन आयडियाकडे देखील ६६६ रुपयांचा प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये ७७ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. अशाप्रकारे प्लानमध्ये एकूण ११५.५ जीबी डेटा, देशभरात अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/knxGCDb

Comments

clue frame