iPhone 11 वर मिळतोय तगडा डिस्काउंट, डील पाहून तुम्हीही लगेच खरेदी कराल, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: तुम्ही देखील iPhone Fan असाल आणि तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर , तुमच्यासाठी एक मस्त संधी सध्या आहे. एका भन्नाट ऑफरच्या मदतीने तुम्ही वर जबरदस्त डिस्काउंट मिळवू शकता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, iPhone 11 च्या किमतीत कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. तसेच, Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवरही कमी करण्यात आलेली नाही. परंतु, या दोन्ही ई-कॉमर्स वेबसाइट iPhone 11 वर एक्सचेंज आणि बँक ऑफर देत आहेत. Flipkart आणि Amazon iPhone 11 वर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देत आहेत. १२८ GB स्टोरेज असलेला iPhone 11 फ्लिपकार्टवर एक्सचेंजसह ३७,१०० रुपयांना खरेदी करता येईल. तर, Amazon वर त्याची किंमत ४०,००० रुपये आहे. यावर उपलब्ध असलेल्या ऑफर्स जाणून घेऊया. वाचा: flipkart iphone 11 ऑफर: Apple iPhone 11 (ग्रीन कलर) १२८ GB स्टोरेजसह ५४,९०० रुपयांना खरेदी करता येईल. तुम्ही एक्सचेंज ऑफरद्वारे आयफोनची किंमत आणखी कमी करू शकता. एक्सचेंज ऑफरद्वारे iPhone 11 खरेदी केल्यास तुम्हाला १७,८०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. त्यानंतर फ्लिपकार्टवर iPhone ची किंमत ३७,१०० रुपये कमी होईल. यासाठी तुम्हाला तुमचा पिन कोड प्रविष्ट करावा लागेल आणि तुमच्या लोकेशनवर एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे की नाही ते तपासावे लागेल. तसेच, एक्स्चेंजसह किंमतीवरील सवलत तुम्ही एक्सचेंज करत असलेल्या फोन मॉडेलवर अवलंबून असेल. फ्लिपकार्ट बँक ऑफर: UPI व्यवहारांवर १००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. स्लाइस व्हिसा क्रेडिट कार्डवर ५००० रुपये आणि त्यावरील ऑर्डरवर १० % सूट मिळेल. येस बँक क्रेडिट कार्ड्सवर १० % पर्यंत सूट. ५,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या ऑर्डरवर १,००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. IDFC क्रेडिट कार्डद्वारे ५,००० रुपये आणि त्याहून अधिकच्या ऑर्डरवर १,००० रुपयांपर्यन्त १० % सूट, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर ५ % अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला सर्व अटी व शर्ती तपासाव्या लागतील. इतर ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला PharmEasy वर २५ टक्के सूट मिळेल. ६ महिन्यांसाठी गाना प्लस सबस्क्रिप्शन विनामूल्य आहे आणि तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये २०१ रुपयांचे बिटकॉइन जोडू शकता. Amazon ऑफर: येथे iPhone 11 Green Color ची किंमत ५४,९०० रुपये आहे. पण, एक्सचेंजद्वारे आयफोन खरेदी केला तर तुम्हाला १४,९०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. त्यानंतर फोनची किंमत ४०,००० रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. तसेच, Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड पेमेंटवर ३२,९४० रुपयांच्या किमान खरेदीवर २३५३ रुपयांची ची इन्स्टंट सूट मिळेल. किमान ३२,९४० रुपयांच्या खरेदीवर SBI क्रेडिट कार्ड व्यवहारांवर ४,००० ची झटपट सूट, ICICI बँक डेबिट कार्ड व्यवहारांवर ३२,९४० रुपयांच्या किमान खरेदीसाठी ४,००० ची इन्स्टंट सूट आणि ICICI बँक क्रेडिट कार्ड्स (Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड वगळून) क्रेडिट कार्ड व्यवहारांवर ४,००० ची त्वरित सूट दिली जाईल. यासाठी किमान खरेदी ३२,९४० रुपयांची असावी. कोटक बँक कार्ड्सवर ३२,९४० रुपयांच्या किमान खरेदीसह ४,००० रुपयांची इन्स्टंट सूट. HSBC कॅशबॅक कार्ड व्यवहारांवर ५ टक्के झटपट सूट मिळेल. HDFC बँक मिलेनिया क्रेडिट कार्ड्सवर ५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ahLZAyV

Comments

clue frame