Infinix चा पहिला ५जी स्मार्टफोन भारतात लाँच, मिळेल १३GB रॅम आणि ४८MP ट्रिपल कॅमेरा, पाहा किंमत

नवी दिल्ली: ने गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला आपला पहिला ५जी Infinix Zero 5G ला भारतात लाँच केले आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि ५ जीबी व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट दिला आहे. अशाप्रकारे, झिरो ५जी स्मार्टफोनमध्ये एकूण १३ जीबी रॅमचा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये १२८ जीबी स्टोरेजचा सपोर्ट मिळतो. इनफिनिक्सच्या या ५जी फोनची किंमत १९,९९९ रुपये आहे. फोनची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून होईल. फोन कॉस्मिक ब्लॅक, स्काय लाइट ऑरेंट रंगात येतो. स्मार्टफोनला स्मार्ट अपग्रेड प्लान अंतर्गत ७० टक्के किंमत देऊन फक्त १३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तसेच, ६ हजार रुपये एक वर्षानंतर द्यावे लागतील. ग्राहक फोनला परत करून नवीन Infinix Zero 5G स्मार्टफोन देखील खरेदी करू शकतील. वाचा: स्पेसिफिकेशन्स Infinix Zero 5G स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंच FHD+ LTPS डिस्प्ले सपोर्ट दिला आहे. फोनचे पीक ब्राइटनेस ५०० नीट्स आहे. फोनचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. याशिवाय फोनमध्ये टच सँपलिंग रेट २४० हर्ट्जचा सपोर्ट दिला आहे. फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशियो ९२ टक्के आहे. फोनमध्ये लेटेस्ट ६ एनएम बेस्ड ऑक्टाकोर डायमेंसिटी ९०० प्रोसेसरचा सपोर्ट दिला असून, हा फोन अँड्राइड ११ आधारित XOS १०.० वर काम करतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. Infinix Zero 5G स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. याशिवाय १३ मेगापिक्सल पोर्ट्रेट लेंस आणि २ मेगापिक्सल बोकेह लेंस दिली आहे. फोनमध्ये ३० एक्स झूमचा सपोर्ट मिळतो. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा AI कॅमेरा दिला आहे, जो ड्यूल फ्लॅश लाइट सपोर्टसह येतो. पॉवर बॅकअपसाठी यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक दिले आहे. फोनमध्ये १३ ५जी बँड्स दिले आहेत. कंपनीचा हा पहिलाच ५जी फोन आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/DNWrUCw

Comments

clue frame