नवी दिल्ली: तुम्हीही वापरत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. जर तुम्ही काही कारणास्तव कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर, ही विशेष माहिती तुमच्यासाठी आणखी फायदेशीर ठरू शकते. आता तुम्ही Google Pay द्वारे काही मिनिटांत वैयक्तिक कर्ज देखील घेऊ शकता. नुकतेच Private Limited (DMI) ने Google Pay वर वैयक्तिक कर्ज उत्पादन लाँच करण्याची घोषणा केली आहे. युजर्स याचा दुहेरी लाभ घेऊ शकतात. खरं तर, याद्वारे युजर्सना Google Pay चा ग्राहक अनुभव आणि DMI च्या डिजिटल कर्ज वितरण प्रक्रियेचा दुहेरी फायदा मिळू शकतो. कर्ज घेणाऱ्या नवीन वापरकर्त्यांना यामुळे खूप मदत होईल. एक लाखापर्यंतचे कर्ज तुम्ही सहज घेऊ शकता. या सेवेअंतर्गत, युजर्स कमाल ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहजपणे घेऊ शकतात. Google Pay वर उपलब्ध असलेले हे वैशिष्ट्य १५,००० पेक्षा जास्त पिन कोडसह लाँच केले जात आहे. वाचा: डीएमआय फायनान्स कसे काम करेल? सर्व प्रथम, DMI Finance प्री-क्वालिफाइड एलिजिबल युजर्सची निवड करेल. यानंतर, Google Pay द्वारे त्या युजर्सना प्रोडक्ट ऑफर करेल. यानंतर युजर्सचे अर्ज रिअल टाइममध्ये प्रोसेस केले जाईल हे केल्यानंतर, कर्जाचे पैसे ग्राहक/वापरकर्त्यांना त्यांच्या बँक खात्यात त्वरित हस्तांतरित केले जातील. प्रत्येक Google Pay वापरकर्त्याला या सुविधेचा लाभ मिळणार नाही: येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, Google Pay वापरणाऱ्या प्रत्येक युजर्सला या सुविधेचा लाभ मिळू शकणार नाही. या सुविधेचा लाभ फक्त तेच युजर्स घेऊ शकतात ज्यांचा क्रेडिट स्कोअर चांगला आहे. या सुविधेबद्दल कंपनीचे काय म्हणणे आहे? शिवाशिष चॅटर्जी, सह-संस्थापक आणि जॉइंट एमडी, DMI फायनान्स,यांनी सांगितले की , “आमच्या टीमने लाखो Google Pay युजर्सना पारदर्शक आणि क्रेडिट आणण्यासाठी एकत्र काम केले आहे. पुढील वर्षांमध्ये, आम्ही नवीन भागीदारी वाढवण्याचा आणि लाखो लोकांसाठी आर्थिक संधी/समावेश करण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. ज्याचा फायदा युजर्सना होईल. मोबाईल फोनवर फक्त एका क्लिकवर हे कर्ज युजर्सना सहज उपलब्ध करून दिले जाईल, असेही कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, Google Pay युजर्ससाठी ही कर्ज सुविधा शक्य करण्यासाठी त्यांना DMI Finance चे समर्थन मिळाले आहे, ज्याबद्दल प्रत्येकजण खूप उत्सुक आहे. कारण, ते तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक समावेशाचे स्वप्न साकार करू शकतील. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/BE7lexY
Comments
Post a Comment