Google ने भारतात लाँच केली Google Play Pass सर्विस, जाहिरातींशिवाय खेळता येणार १ हजारांपेक्षा अधिक गेम्स
नवी दिल्ली: टेक कंपनी गुगलने भारतीय यूजर्ससाठी आपली नवीन सर्विस ला लाँच केले आहे. या सर्विसच्या माध्यमातून यूजर्सला कोणत्याही जाहिरातींशिवाय व खरेदी न करता १ हजार पेक्षा जास्त अॅप्स आणि गेम्सची सुविधा मिळेल. भारतीय यूजर्सला Pass साठी महिन्याला ९९ रुपये आणि वर्षाला ८८९ रुपये खर्च करावे लागतील. यासोबतच, यूजर्सला एक महिन्याचे ट्रायल देखील मिळेल. Google Play Pass सर्विस जवळपास ९० पेक्षा अधिक देशात उपलब्ध आहे. या सर्विसमुळे आता भारतीय डेव्हलपर्सला देखील कमाईचे नवीन माध्यम उपलब्ध झाले असून, सोबतच, जागतिक बाजारात आपला यूजर बेस देखील वाढवता येणार आहे. गुगलच्या या सर्विसच्या माध्यमातून यूजर्सला आवडत्या गेम्स, अॅप्स आणि डिजिटल कंटेंटचा अॅक्सेस मिळतो. कंपनीने Google Play Pass ला भारतीय यूजर्ससाठी लाँच केले असून, या आठवड्यात ही सर्विस उपलब्ध होईल. या सर्विसच्या माध्यमातून यूजर्सला इन- अॅप खरेदी, कोणत्याही जाहिरातीशिवाय आणि अपफ्रंट पेमेंटशिवाय गेम्स आणि अॅप्सचा अॅक्सेस मिळतो. Play Pass च्या माध्यमातून वेगवेळ्या ४१ कॅटेगरीजमध्ये १ हजारांपेक्षा अधिक कंटेंट यूजर्ससाठी उपलब्ध होईल. तसेच, भारतासह ५९ देशातील डेव्हलपर्सचा कंटेंट यावर उपलब्ध असेल. यूजर्स एक महिन्याच्या ट्रायलसह ९९ रुपये दरमहिना आणि वर्षाला ८८९ रुपये देवून या सर्विसचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय १०९ रुपये खर्च करून एक महिन्याचे प्रीपेड सबस्क्रिप्शन देखील घेऊ शकतात. याचे वैशिष्ट्ये म्हणजे या सर्विसचा फायदा एकाचवेळी कुटुंबातील ५ जण घेऊ शकतात. या सर्विसच्या लाँचिंग निमित्ताने बोलताना Play Partnerships, Google India चे डायरेक्टर आदित्य स्वामी म्हणाले की, ‘आम्हाला असे प्रोडक्ट्स आणि प्रोग्राम्स उपलब्ध करायचे आहेत, जे यूजर्स आणि डेव्हलपर्स दोन्हींसाठी फायद्याचे ठरतील. यासाठी आम्ही नवनवीन मार्ग शोधत आहोत. प्ले पासच्या भारतातील लाँचसोबतच यूजर्सला एक नवीन कलेक्शन उपलब्ध करण्यासाठी व लोकल डेव्लपर्ससोबत जोडण्यासाठी उत्साहित आहोत.’ दरम्यान, प्ले पासमध्ये स्पोर्ट्स, पझल्स आणि अॅक्शन गेम्सचा समावेश आहे. यूजर्सला Jungle Adventures, World Cricket Battle 2, and Monument Valley, helpful apps like Utter, Unit Converter, AudioLab या गेम्ससह Photo Studio Pro, Kingdom Rush Frontiers TD असे अनेक अॅप्स देखील वापरता येतील. दरम्यान, Play Pass सर्विस या आठवड्यापासून भारतीय यूजर्ससाठी उपलब्ध होणार असून, यूजर्स अँड्राइड डिव्हाइसमध्ये प्ले स्टोरच्या माध्यमातून या सर्विसचा फायदा घेऊ शकतात. प्ले स्टोरवर प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्रिप्शन घेता येईल. सबस्क्राइबर्स Play Pass “ticket" च्या माध्यमातून अॅप्स आणि गेम्सला अॅक्सेस करू शकतील. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Ltu5epU
Comments
Post a Comment