६० दिवसांपेक्षा अधिक व्हॅलिडिटीसह येणारे 'हे' जबरदस्त प्लान्स देतात ११५ GB डेटासह फ्री कॉलिंग, पाहा इतर बेनिफिट्स
नवी दिल्ली: टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्लान्स ऑफर करत असतात. कमी किमतीपासून ते अगदी हजारो रुपयांपर्यंत विविध प्लान्स या कंपन्या ग्राहकांना उपलब्ध करून देतात. Airtel आणि Vodafone-Idea युजर्सना अनेक उत्तम प्रीपेड प्लान ऑफर करत आहेत. या प्लान्सच्या लांबलचक यादीमध्ये, दोन्ही कंपन्यांचे प्लान्स ६६६ रुपयांमध्ये ऑफर करण्यात येत आहे . ७७ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये ११५ जीबी पर्यंतचा डेटा आणि फ्री कॉलिंगसह अनेक अतिरिक्त फायदेही दिले जात आहेत. या प्लानमध्ये या दोनपैकी कोणती कंपनी युजर्सना अधिक फायदे देत आहे ते जाणून घेऊया. Airtel चा ६६६ रुपयांचा प्लान: एअरटेलचा हा प्लान ७७ दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज १.५ GB नुसार एकूण ११५.५ GB डेटा दिला जात आहे. वाचा: प्लानमध्ये, कंपनी दररोज १०० मोफत एसएमएससह देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करत आहे. प्लानध्ये समाविष्ट असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या ३० -दिवसांच्या विनामूल्य चाचणीसह विंक म्युझिकचा विनामूल्य प्रवेश समाविष्ट आहे. Vodafone-Idea कडे देखील ७७ दिवसांची वैधता असलेला प्लान आहे. यात देखील अनेक फायदे दिले जातात. Vodafone-Idea चा ६६६ रुपयांचा प्लान: ७७ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटा मिळेल.या प्लानमध्ये, कंपनी देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करत आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज १०० मोफत एसएमएसचाही लाभ मिळेल. प्लानमध्ये उपलब्ध या मूलभूत फायद्यांव्यतिरिक्त, कंपनी आणखी बरेच काही ऑफर करत आहे.या प्लानच्या ग्राहकांना बिंज ऑल नाईट लाभ दिला जात आहे. या अंतर्गत, युजर्स रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत अमर्यादित डेटा वापरू शकतात आणि वापरकर्त्याच्या मुख्य डेटामधून तो कापला जाणार नाही. प्लानमध्ये तुम्हाला वीकेंड डेटा रोलओव्हर देखील दिला जात आहे. प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे कंपनी यामध्ये डेटा डिलाइट अंतर्गत २ GB पर्यंत बॅकअप डेटा देखील देत आहे. कमी व्हॅलिडिटी आणि स्वस्त किमतीत प्लान्स खरेदी करायचा असल्यास Airtel ९९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला २०० एमबी डेटा, ९९ रुपये टॉकटाइम, १ पैसा टॅरिफ कॉल, लोकल एसएमएससाठी १ रुपये आणि एसटीडी एसएमएससाठी १.५ रुपये चार्ज लागेल. ९९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस आहे. डेटा, कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्ससह येणारा हा सर्वात स्वस्त प्लानपैकी एक आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/C46eZWF
Comments
Post a Comment