बॉस ऑफर! 'ही' कंपनी देतेय २२ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी, ७५ रुपयांत २ GB डेटा आणि कॉलिंग, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: आजकाल ग्राहकांची आवड आणि गरजेनुसार टेलिकॉम कंपन्या वेग-वेगळे फायदे प्रदान करतात. सरकारी दूरसंचार कंपनी BSNL (BSNL) इतर खाजगी कंपन्यांच्या तुलनेत अधिक स्वस्त प्लान्स ऑफर करते. आजकाल स्मार्टफोन्सचा वापर वाढल्यामुळे अनेक लोक एकाच वेळी दोन सिम वापरतात. त्यांच्यापैकी अनेक युजर्स BSNL दुय्यम सिम म्हणून देखील वापरत आहेत. अशा युजर्ससाठी त्यांच्यासाठी कंपनीकडे अनेक उत्तम रिचार्ज आहेत. ग्राहक BSNL च्या स्वस्त वैधता विस्तार योजना वापरू शकतात, जे कमी किमतीत अधिक वैधता ऑफर करेल. तुमचे सिम देखील सक्रिय असेल आणि रिचार्जकरिता खूप खर्च देखील तुम्हाला करावा लागणार नाही. वाचा: सेकंडरी सिमसाठी बीएसएनएलचे स्वस्त प्लान्स : या यादीतील सर्वात स्वस्त BSNL रिचार्ज २२ ररुपयांचा आहे. जो ९० दिवसांची वैधता देतो . या व्हॉईस व्हाउचरमध्ये, सर्व लोकल आणि एसटीडी कॉलसाठी ग्राहकांना ३० पैसे प्रति मिनिट आकारले जातात. कंपनीकडे ७५ आणि ९४ रुपयांचे प्रीपेड प्लान देखील आहेत. जे, ५० दिवस आणि ७५ दिवसांच्या वैधतेसह येतात. ७५ रुपयांच्या प्लानमध्ये २ GB डेटा आणि ९४ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ३ GB डेटा दिला जातो. दोन्ही प्लान कॉलिंगसाठी १०० मिनिटांची ऑफर देखील देतात. दररोज २ GB डेटा मिळवा: बीएसएनएलचा ८८ रुपयांचा प्रीपेड प्लान देखील एक चांगला पर्याय असू शकतो. ९० दिवसांच्या वैधतेसह, प्लॅन ०.८ पैसे/सेकंद दराने स्थानिक/एसटीडी कॉल ऑफर करतो. जर तुम्हाला तुमच्या दुय्यम नंबरमध्ये डेटा बॅकअप हवा असेल तर तुम्ही १९८ रुपयांचा डेटा प्लान देखील रिचार्ज करू शकता. BSNL च्या १९८ रुपयांच्या प्लानमध्ये ५० दिवसांसाठी २ GB / दिवस डेटा मिळतो. बीएसएनएल ग्राहकांसाठी ८४ दिवसांसह १०६ रुपये आणि १०६ रुपये प्रति सेकंद आणि प्रति मिनिट प्रीमियम प्लान देखील ऑफर करते. दोन्ही प्लान कोणत्याही नेटवर्कवर १०० मिनिटे मोफत कॉलची सुविधा देतात. यामध्ये ३ जीबी डेटाही देण्यात आला आहे. दोन्ही प्लान्समध्ये पल्स रेटमध्ये फरक आहे. १०६ रुपयांच्या प्लानमध्ये कॉलसाठी प्रति सेकंद शुल्क आकारले जाते, तर १०७ रुपयांच्या प्लानमध्ये प्रति मिनिट कॉल शुल्क आकारले जाते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/WaiFYLA

Comments

clue frame