नवी दिल्ली: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) युजर्सना १५० Mbps ब्रॉडबँड प्लान ऑफर करते. प्लानमध्ये अनेक उत्तम फायदे उपलब्ध आहेत. सध्या, फिक्स्ड लाइन सर्व्हिस मार्केटवर Reliance jio आणि Airtel चे वर्चस्व असू शकते. परंतु, BSNL अजूनही बाजारपेठेतील सर्वात मोठ्या कंपन्यापैकी एक आहे. जर तुम्ही १५० Mbps ब्रॉडबँड प्लान शोधत असाल, तर बरेच जण तुम्हाला JioFiber निवडण्यासाठी सुचवू शकतात. परंतु, तुम्ही BSNL चा १५० Mbps ब्रॉडबँड प्लान देखील तपासला पाहिजे. BSNL च्या या प्लानचे नाव SuperStar PremiumPlus आहे आणि त्याची किंमत ९९९ रुपये प्रति महिना आहे. BSNL 150 Mbps ब्रॉडबँड प्लान: नमूद केल्याप्रमाणे, BSNL च्या या १५० Mbps ब्रॉडबँड प्लानची किंमत ९९९ रुपये प्रति महिना आहे. म्हणजेच दररोजची किंमत सुमारे ३३ रुपये असेल. हा प्लान २TB (म्हणजे २००० GB) मासिक डेटा मर्यादेसह येतो. वाचा: डेटा मर्यादा वापरल्यानंतर, १० एमबीपीएसचा वेग उपलब्ध आहे. याशिवाय, बीएसएनएल अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय विनामूल्य लँडलाइन कनेक्शन ऑफर करते. या प्लान्सचे फायदे इथेच संपत नाहीत. योजनेमध्ये ओव्हर-द-टॉप (OTT) फायदे देखील समाविष्ट आहेत. हे OTT फायदे Disney+ Hotstar, ShemarooMe, Lionsgate, Hungama, SonyLIV, ZEE5, Voot आणि YuppTV सारख्या काही आघाडीच्या प्लॅटफॉर्मवर सदस्यता देतात. पहिल्या बिलावर ९०% सूट: याव्यतिरिक्त, यूजर्स नवीन कनेक्शन खरेदी करतात तेव्हा त्यांना पहिल्या महिन्याच्या बिलावर ५०० रुपयांपर्यंत ९० % सूट मिळते. या किमतीतील हे फायदे ग्राहकांसाठी हा प्लान व्हॅल्यू फॉर मनी बनवतात. BSNL कडे इतरही काही भन्नाट प्लान्स आहेत. जर तुम्हाला तुमच्या दुय्यम नंबरमध्ये डेटा बॅकअप हवा असेल तर तुम्ही १९८ रुपयांचा डेटा प्लान देखील रिचार्ज करू शकता. BSNL च्या १९८ रुपयांच्या प्लानमध्ये ५० दिवसांसाठी २ GB / दिवस डेटा मिळतो. बीएसएनएल ग्राहकांसाठी ८४ दिवसांसह १०६ रुपये आणि १०६ रुपये प्रति सेकंद आणि प्रति मिनिट प्रीमियम प्लान देखील ऑफर करते. दोन्ही प्लान कोणत्याही नेटवर्कवर १०० मिनिटे मोफत कॉलची सुविधा देतात. यामध्ये ३ जीबी डेटाही देण्यात आला आहे. दोन्ही प्लान्समध्ये पल्स रेटमध्ये फरक आहे. १०६ रुपयांच्या प्लानमध्ये कॉलसाठी प्रति सेकंद शुल्क आकारले जाते, तर १०७ रुपयांच्या प्लानमध्ये प्रति मिनिट कॉल शुल्क आकारले जाते. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/QMVkuCT
Comments
Post a Comment