नवी दिल्ली: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करायचा झाल्यास त्यात चे नाव हमखास येणार. तुम्हाला देखील जर कुणी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव विचारले तर तुमचे उत्तर देखील तेच असेल. किंवा तुम्ही जेफ बेझोस, बिल गेट्स किंवा मार्क झुकरबर्ग यांचे नाव घेऊ शकता. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, नुकतीच एक व्यक्ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली आहे. होय Elon Musk पेक्षा श्रीमंत. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, ही व्यक्ती केवळ ७ मिनिटेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनून राहू शकली.स्पेस एक्सचचे संस्थापक आणि सीईओ एलोन मस्क कायमच चर्चेत असतात. तुमच्या माहितीसाठी, इलॉन मस्कची एकूण संपत्ती $२०० अब्जांपेक्षा जास्त सुमारे $३२८ अब्ज आहे. Elon यांच्या अमाप संपत्तीची कायमच सर्वत्र चर्चा असते. वाचा: यूकेच्या मॅक्स फॉश नामक एका व्यक्तीने मस्कला मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याच्या खिताब मिळविला . मॅक्स फॉशची एकूण संपत्ती मस्कच्या दुप्पट आहे. परंतु, Max चा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कारण, त्याने अवघ्या सात मिनिटांत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब गमावला सुद्धा. मॅक्स फॉश एक YouTuber आहे. ज्याने दावा केला आहे की, तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला. पण, सुमारे ७ मिनिटे. मॅक्स फॉशने Unlimited Money Ltd नावाची कंपनी नोंदणीकृत केली. ज्यासाठी त्याने १० अब्ज शेअर्स निश्चित केले. मॅक्सने त्याच्या कंपनीचा १ शेअर £ ५० मध्ये विकला, जो एका महिलेने विकत घेतला. हे शेअर्स विकण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या कडेला खुर्ची-टेबल लावून अनेकांशी संवादही साधला. त्यानंतर एका महिलेने त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास होकार दिला. अशा प्रकारे त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन ५०० अब्ज पौंड झाले. परंतु, हा आनंद काही क्षणांसाठीच होता. एका शेअरच्या विक्री किमतीवर आधारित मूल्यांकनाची गणना करण्यासाठी मॅक्स फॉशने कंपनीची कागदपत्रे अधिकाऱ्यांना पाठवली. त्यावर अधिकाऱ्यांनी लवकरच त्याला एक पत्र पाठवले की, एका शेअरच्या विक्रीमुळे त्याच्या कंपनीचे मूल्य £५०० बिलियन इतके होते. मात्र, त्यांची कंपनी एवढ्या मोठ्या व्हॅल्युएशनला सपोर्ट करत नाही. कारण, त्यांच्या कंपनीला कोणताही महसूल नाही किंवा ते कोणतेही उत्पादन विकत नसल्याचंही पत्रात लिहिलं होतं. अशा स्थितीत त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/fqScKex
Comments
Post a Comment