BSNL चा सुपरहिट प्लान! मिळवा १०० GB डेटा आणि ६० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह महिनाभर फ्री कॉलिंग, डेली डेटा लिमिटचेही नाही टेन्शन

नवी दिल्ली: तुम्ही जर BSNL युजर असाल तर, अनेक चांगल्या BSNL प्लान्सचा लाभ तुम्ही कमी किमतीत घेऊ शकता. BSNL आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रीपेड रिचार्ज प्लान ऑफर करत आहे. जर तुम्ही ६० दिवसांची वैधता असलेला प्लान शोधत असाल तर बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये अशा अनेक योजना उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला कमी किमतीत चांगले फायदे देतील. BSNL या प्लानमध्ये ६० दिवसांपर्यंत वैधतेसह, अनेक सेवांचा लाभ देखील उपलब्ध आहे. कंपनी युजर्ससाठी ४४७ रुपयांचा प्लान देखील ऑफर करते. ज्यामध्ये यूजर्सना Eros Now चे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे. यासोबतच, या प्लानमध्ये BSNL Tunes ची सुविधा देखील उपलब्ध आहे. रिचार्ज प्लानमध्ये, युजर्सना १०० GB डेटासह दररोज १०० SMS दिले जात आहेत. सोबतच बीएसएनएलच्या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधाही दिली जात आहे. वाचा: FUP मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, युजर्सना ८० Kbps च्या वेगाने डेटा देखील मिळेल. या प्लानमध्ये तुम्हाला एकूण १०० GB डेटा मिळत असल्याने तुम्हाला दररोज डेटाची काळजी करण्याची गरज नाही. म्हणजेच, या प्लानमध्ये यूजर्सला कोणत्याही डेली लिमिटशिवाय डेटा दिला जात आहे. जर तुम्ही परवडणारा प्लान शोधत असाल, तर BSNL चा २४७ रुपयांचा प्लान देखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. या प्लानमध्ये ४४७ रुपयांमध्ये अर्धा लाभ उपलब्ध आहे. BSNL ग्राहकांना २४७ रुपयांमध्ये एकूण ५० GB डेटा मिळतो. ज्याची, वैधता ३० दिवस असते. या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस दिले जात आहेत. प्रीपेड रिचार्जमध्ये, वापरकर्त्यांना Eros Now आणि BSNL Tune चे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे. सध्या, कंपनी पोर्टफोलिओमध्ये ६० दिवस आणि ३० दिवसांच्या वैधतेसह हे २ प्लान्स ऑफर करत आहे. इतर पर्याय पाहायचे झाल्यास कंपनीकडे ६६६ रुपयांच्या किंमतीत येणारा शानदार प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. ६६६ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला ११० दिवसांची वैधता दिली जात आहे. या प्लानमध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण २२० जीबी डेटा मिळतो. तसेच, डेली डेटा समाप्त झाल्यानंतर यूजर्स ४० Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकतात. प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळते. तसेच, दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतील. या प्लानमध्ये फ्री कॉलरट्यून्स आणि लोकधुन कॉन्टेंटची मेंबरशिप दिली जात आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/hBGtRYq

Comments

clue frame