कोणत्याही लिमिटशिवाय वापरा डेटा! ‘या’ स्वस्त प्लानमध्ये ६० दिवसांच्या वैधतेसह मिळेल १०० जीबी डेटा-मोफत कॉलिंग
नवी दिल्ली: सरकारी टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रतिस्पर्धी कंपनी , आणि वीआयच्या तुलनेत अनेक शानदार प्लान्स ऑफर करत आहे. कंपनीकडे कमी किंमतीत येणारे अनेक चांगले प्लान्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर ६० दिवसांच्या वैधतेसह येणारा प्लान शोधत असाल तर BSNL च्या पोर्टफोलियोमध्ये असे अनेक प्लान्स आहे. या प्लान्समध्ये ६० दिवसांच्या वैधतेसह अनेक बेनिफिट्स मिळतील. कंपनीकडे ४४७ रुपयांचा एक शानदार प्लान आहे. या प्लानमध्ये यूजर्सला चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. तसेच, BSNL ट्यून्स देखील मोफत मिळेल. या स्वस्त प्लान्समध्ये यूजर्सला एकूण १०० जीबी डेटासह दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. वाचा: BSNL च्या ४४७ रुपयांच्या प्लानमध्ये डेटा-एसएमएससह अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. यूजर्स देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. FUP लिमिट पूर्ण झाल्यानंतर यूजर्स ८० Kbps च्या स्पीडने डेटा वापरू शकतात. प्लानमध्ये एकूण १०० जीबी डेटा मिळत असल्याने, दररोज डेटा समाप्त होण्याचे टेन्शनच नाही. यूजर्स कोणत्याही लिमिटशिवाय एका दिवसात देखील संपूर्ण डेटा वापरू शकतात. तुम्ही जर यापेक्षा स्वस्त प्लान शोधत असाल तर BSNL कडे २४७ रुपयांच्या किंमतीत येणारा एक स्वस्त प्लान उपलब्ध आहे. मात्र, या प्लानमध्ये ४४७ रुपयांच्या तुलनेत कमी फायदे मिळतात. २४७ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला एकूण ५० जीबी डेटा दिला जात आहे. या प्लानची वैधता ३० दिवस आहे. या प्लानमध्ये यूजर्सला देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय या प्रीपेड रिचार्जमध्ये यूजर्सला Eros Now आणि BSNL ट्यूनचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. सध्या कंपनीकडे ६० दिवस आणि ३० दिवसांच्या वैधतेसह येणारे हे दोन शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये डेटा, मोफत अनलिमिटेड कॉलिंगसह Eros Now आणि ट्यूनचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे. तुम्ही जर कोणत्याही डेली लिमिटशिवाय येणारा प्रीपेड प्लान शोधत असाल, तर हे दोन प्लान्स फायद्याचे ठरतील. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/xP4Z0yX
Comments
Post a Comment