नवी दिल्ली: निर्माता कंपनी ने काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारात आपली फ्लॅगशिप फोन सीरिज ला लाँच केले आहे. कंपनीने स्मार्टफोन सीरिजच्या किंमतीचा खुलासा केला आहे व सध्या प्री-बुकिंग सुरू आहे. यातच कंपनीने माहिती दिली आहे, फक्त १२ तासांमध्ये गॅलेक्सी ए२२ सीरिजच्या स्मार्टफोनचे विक्रमी प्री-बुकिंग झाले आहे. सॅमसंगनुसार, Galaxy S22 सीरिजच्या स्मार्टफोनचे १२ तासात जवळपास ७० हजार प्री-बुकिंग्स झाले आहे. सॅमसंगने या स्मार्टफोन्ससाठी २३ फेब्रुवारीपासून प्री बुकिंग सुरू केले होते. इंडियाचे सीनियर डायरेक्टर आणि प्रोडक्ट मार्केटिंग हेड आदित्य बब्बर म्हणाले की, गॅलेक्सी एस२२ सीरिजला लोकांचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. तसेच, या डिव्हाइसला लवकरात लवकर ग्राहकांपर्यंत पोहचवले जाईल, असेही त्यांनी सांगितले. वाचा हा या सीरिजमधील सर्वात महागडा स्मार्टफोन आहे. या फोनच्या प्री बुकिंगवर कंपनी ला फक्त २,९९९ रुपयात देत आहे. याची मूळ किंमत २६,९९९ रुपये आहे. Galaxy S22 आणि Galaxy S22 Plus च्या प्री बुकिंगवर ग्राहकांना ११,९९९ रुपये किंमतीचे Galaxy Buds 2 फक्त ९९९ रुपयात मिळतील. अपग्रेड ऑफर अंतर्गत ग्राहकांना ८ हजार रुपयांपर्यंत अपग्रेड ऑफर देखील मिळेल. या जुन्या स्मार्टफोन्स अपग्रेड ऑफर अंतर्गत ५ हजार रुपयांपर्यंत अपग्रेड बोनस दिला जाईल. Samsung Finance+ द्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅक दिला जाईल. Galaxy S22, Galaxy S22 Plus आणि Galaxy S22 Ultra ला भारतातील प्रमुख रिटेल आउटलेट्सवरून बुक करता येईल. याशिवाय सॅमसंग स्टोर्स आणि इतर ई-कॉमर्स वेबसाइटवरून देखील तुम्ही फोन्सचे प्री-बुकिंग करू शकता. प्री-बुकिंगमध्ये या स्मार्टफोन सीरिजला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध झाल्यानंतर याची मागणी वाढेल की कमी, हे पाहावे लागेल. दरम्यान, किंमतीबद्दल सांगायचे तर Galaxy S22 च्या ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ७२,९९९ रुपये, ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ७६,९९९ रुपये आहे. Galaxy S22+ च्या ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिंएंटची किंमत ८४,९९९ रुपये, ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत ८८,९९९ रुपये आहे. तसेच, Galaxy S22 Ultra च्या ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १,०९,९९९ रुपये आणि १२ जीबी + ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत १,१८,९९९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/dleuyF9
Comments
Post a Comment