६ हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन, फीचर्स मन जिंकतील; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: ने आपला स्वस्त ४जी itel A27 ला भारतात लाँच केले आहे. या फोनला सिंगल रॅम व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे. फोन २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. या स्मार्टफोनची किंमत फक्त ५,९९९ रुपये आहे. आयटेल ए२७ ला तुम्ही क्रिस्टल ब्लू, सिल्वर पर्पल आणि डीप ग्रे या तीन रंगात खरेदी करू शकता. फोनच्या बॅक पॅनेलवर ग्रेडिएंट टोन ब्लॅक कलर फिनिशिंग दिले आहे. स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये ला टक्कर देतो. जिओफोन नेक्स्टची किंमत देखील ५,९९९ रुपये आहे. याचे स्पेसिफिकेशन्स देखील जिओफोन नेक्स्टला तोडीस तोड आहे. या फोनविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: itel A27 चे स्पेसिफिकेशन्स itel A27 स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंचाचा मोठा डिस्प्ले दिला आहे. डिव्हाइसचा डिस्प्ले FW+IPS सपोर्टसह येतो. यात ऑक्टाकोर १.४ GHz प्रोसेसर दिला आहे. तर फोन अँड्राइड ११ आधारित गो एडिशन ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. तसेच, फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढवू शकता. itel A27 स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी रियरला सिंगल ५ मेगापिक्सल एआय कॅमेरा दिला आहे, जो फ्लॅश सपोर्टसह येतो. तर सेल्फीसाठी २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये अनेक कॅमेरा मोड्स देखील दिले आहेत. यात AI ब्यूटी मोड, पोर्टेट मोड, HDR मोड, शॉर्ट व्हिडिओ, AR फिल्टर्स आणि स्टीकर्सचा समावेश आहे. फोन ड्यूल ४जी सिम सपोर्टसह येतो. पावर बॅकअपसाठी itel A27 स्मार्टफोन स्मार्टफोनमध्ये ४००० एमएएचची मोठी बॅटरी दिली आहे. यात फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेंसर देखील मिळतो. itel A27 ला खरेदी केल्यास फोनसोबत एडॉप्टर, यूएसबी केबल, स्क्रीन फिल्म, यूजर मॅन्यूअलर आणि एक प्रोटेक्टिव्ह कार्डसह वॉरंटी कार्ड दिले जात आहे. दरम्यान, तुम्ही जर कमी किंमतीत येणारा स्मार्टफोन शोधत असाल तर itel A27 एक चांगला पर्याय ठरू शकतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Bb8XhSK

Comments

clue frame