हॅप्पी राहण्यासाठी ‘हे’ टॉप-५ हेल्थ अ‍ॅप्स, तणावापासून ठेवतील लांब; पाहा लिस्ट

नवी दिल्ली : करोना व्हायरस महामारीनंतर लोक आरोग्याबाबत अधिक जागृक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यासाठी टेक्नोलॉजीची देखील मदत घेतली जात आहे. फिट राहण्यासाठी आणि फिटनेस अ‍ॅपचा खासकरून वापर केला जातो. भारतात फिटनेस अ‍ॅपच्या मार्केटमध्ये देखील वृद्धी झाली आहे. गेल्यावर्षी App Annie ने एका रिपोर्टमध्ये म्हटले होते की, २०२० मध्ये भारतात हेल्थ अँड फिटनेस अ‍ॅपच्या डाउनलोडिंगमध्ये ८० टक्के वाढ झाली आहे. गुगलने काही लोकप्रिय हेल्थ अ‍ॅप्सला गुगल प्ले अ‍ॅवॉर्ड दिला आहे. या फिटनेस अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही कॅलरीज ट्रॅकिंग, वर्कआउट, आहार अशा वेगवेगळ्या गोष्टींची माहिती घेऊ शकता. या अ‍ॅप्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: आणि jumpingMinds हे एक मेंटल हेल्थ अँड वेलनेस अ‍ॅप आहे. अ‍ॅपला तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून मोफत डाउनलोड करू शकता. यात स्मार्ट एआय बॉट, सेल्फ केअर टूलचा सपोर्ट मिळतो. तणाव, चिंता या समस्या जाणवत असल्याचा हे अ‍ॅप तुम्हाला उपयोगी येईल. तसेच, Evolve हे देखील एक मेंटल हेल्थ अ‍ॅप आहे. याचा इंटरफेस खूपच शानदार असून, यूजर्स सहज याचा वापर करू शकतात. याचा कंटेंट मेंटल थेरेपीमध्ये मदत करतो. या अ‍ॅपला एक लाखांपेक्षा अधिक यूजर्सने डाउनलोड केले आहे. गेल्यावर्षी करोना काळात लोकं घरात एकटेच असल्याने यावर कंटेंट अपलोड करण्यात आला होता. आणि WHO च्या एका रिपोर्टनुसार, जवळपास ८ बिलियन लोक नैराश्य, तणाव या आजाराशी लढत आहे. यातील ६० टक्के लोकांना मेंटल हेल्थकेअरची गरज आहे. हे अ‍ॅप यूजर्सला सेल्फ थेरेपीची सुविधा प्रदान करते. या अ‍ॅपचा उद्देश २०३० पर्यंत एक अब्ज लोकांची मदत करणे हा आहे. तसेच, प्ले स्टोरवर SARVA नावाचे देखील एक अ‍ॅप उपलब्ध आहे. तुम्ही जर योगासाठी एखादे अ‍ॅप शोधत असाल तर हे बेस्ट अ‍ॅप आहे. यात योगाद्वारे वजन कमी करण्यापासून ते शांत झोपेची माहिती माहिती मिळते. यात योगाचे २५ प्रकारचे कंटेंट उपलब्ध आहे. या अ‍ॅपला २०१३ मध्ये लाँच करण्यात आले होते. सध्या या अ‍ॅपला ५ लाखांपेक्षा अधिकवेळा डाउनलोड करण्यात आले आहे. Evergreen Club Evergreen Club या अ‍ॅपला खासकरून वृद्धांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. Evergreen Club चा उद्देश वृद्धांना मदत करणे हा आहे. २०२० मध्ये या अ‍ॅपला लाँच करण्यात आले होते. या अ‍ॅपशी ५५ व त्यापुढील वय असलेले लोक जोडले जाऊ शकतात. यात योगापासून ते पझल सारखे गेम्स देखील उपलब्ध आहेत. तुम्ही जर चांगल्या आरोग्यासाठी व फिट राहण्यासाठी अ‍ॅप शोधत असाल तर वरील सर्व पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरतील. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही आहार, आरोग्याची विशेष काळजी घेऊ शकाल. हे अ‍ॅप्स प्ले स्टोरवर मोफत उपलब्ध आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Bgasyd9

Comments

clue frame