धमाकेदार ऑफर! ३२ इंच स्मार्ट टीव्हीवर तब्बल २५ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्ली: तुम्ही जर नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लेटफॉर्म वर खूपच कमी किंमतीत अनेक शानदार स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहे. या टीव्हीद्वारे तुम्ही घरीच मोठ्या स्क्रीनवर चित्रपटाचा आनंद घेऊ शकता. फ्लिपकार्टवर ३२ इंच डिस्प्लेसह येणाऱ्या स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळत आहे. संपूर्ण ऑफर्सचा लाभ मिळाल्यास या टीव्हीला फक्त ७६४ रुपयात खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर कंपनीचा स्मार्ट टीव्ही स्वस्तात उपलब्ध आहे. या ३२ इंच टीव्हीवर तुम्ही फ्लॅट डिस्काउंट, बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. टीव्हीच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. Coocaa 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV वरील ऑफर्स Coocaa 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV ची मूळ किंमत २५,९९९ रुपये आहे. मात्र, ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर हा टीव्ही ५० टक्के डिस्काउंटनंतर फक्त १२,९९९ रुपयात उपलब्ध आहे. बँक ऑफर्सबद्दल सांगायचे तर अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून टीव्हीला खरेदी केल्यास १,२३५ रुपये डिस्काउंट मिळेल. अशाप्रकारे टीव्हीची किंमत अजून कमी होऊन ११,७६४ रुपये होईल. Coocaa च्या या ३२ इंच स्मार्ट टीव्हीवर एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळत आहे. जुना टीव्ही देऊन या स्मार्ट टीव्हीला खरेदी केल्यास तुम्ही ११ हजार रुपयांची बचत करू शकता. मात्र, ही ऑफर जुन्या टीव्हीच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. स्मार्ट टीव्हीवर पूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळाल्यास या टीव्हीला तुम्ही फक्त ७६४ रुपयात खरेदी करू शकता. Coocaa 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV चे फीचर्स Coocaa 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV दमदार फीचर्ससह येतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये ३२ इंच एचडी रेडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल आणि रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये दोन स्पीकर्स आणि २० वॉटचे साउंड आउटपूट दिले आहे. याशिवाय यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि युट्यूब सारख्या अ‍ॅप्सचा देखील सपोर्ट मिळतो. तुम्ही जर कमी किंमतीत येणारा टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा ३२ इंच स्मार्ट टीव्ही एक चांगला पर्याय ठरेल. Coocaa च्या या स्मार्ट टीव्हीला तुम्ही फ्लिपकार्टवरून स्वस्तात खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/QUXxiCL

Comments

clue frame