एकापेक्षा एक भन्नाट डिव्हाइस! ‘हे’ शानदार गॅजेट्स तुमच्या घराला बनवतील ‘स्मार्ट’, पाहा लिस्ट

नवी दिल्ली: बाजारात कमी किंमतीत येणारे अनेक स्वस्त उपलब्ध आहेत, जे तुमच्या घराला स्मार्ट बनवतील. या गॅजेटमुळे अनेक कामे सोपी होण्यासोबतच वीज, वेळ आणि पैशांची देखील बचत होते. या स्मार्ट डिव्हाइसला खरेदी केल्यास तुमचा नक्कीच फायदा होईल. कारण या डिव्हाइसला कोठूनही ऑपरेट करणे शक्य आहे. हे डिव्हाइस तुमच्या घराला स्मार्ट बनवण्यास मदत करतील. यामध्ये स्मार्ट टीव्ही, स्मार्ट क्लॉक, एअर टॅग, स्मार्ट लॉक आणि ऑडिओ प्रोडक्टचा समावेश आहे. प्रमुख ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर हे प्रोडक्ट्स तुम्हाला स्वस्तात मिळतील. या डिव्हाइसविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Cybersound 55 CSA 7090 Blaupunkt च्या ५५ इंच 4K TV ला तुम्ही खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. या स्मार्ट टीव्हीमध्ये ६० वॉट स्पीकर दिले असून, ते Dolby Digital आणि Dolby TruSurround टेक्नोलॉजीसह येतात. यात Dolby MS12 ऑडिओ सिस्टम देखील आहे, जी Dolby Atmos, Dolby Digital, आणि DTX:X टेक्नोलॉजीच्या मदतीने ऑडिओ कंटेंटला अधिक शानदार बनवते. हे ऑडिओ सिस्टम व्हर्च्यूअल साउंडला शानदार बनवते. तसेच, स्पीकरला ट्यून करते. या टीव्हीमध्ये बेझल-लेस डिझाइन दिली आहे. या टीव्हीमुळे तुमच्या घराला आकर्षक लूक मिळेल. आणि Lenovo Smart Clock Essential तुमच्या घराला अधिक आकर्षक बनवतील. या स्मार्ट क्लॉकचा वापर वेळ जाणून घेण्यासाठी होतोच, मात्र एक आकर्षक डिझाइन म्हणून देखील होईल. यात वेदर अ‍ॅनालिटिक्स देखील दिले आहेत. खास गोष्ट म्हणजे यात स्मार्ट स्पीकर असून, गुगल असिस्टेंटद्वारे कमांडच्या माध्यमातून गाणी ऐकू शकता. यात एक लहान लाइट दिली आहे. यामुळे हे डिव्हाइस बेडसाइड टेबलसाठी देखील उत्तम ठरते. याशिवाय, Apple AirTag हे छोटेस डिव्हाइस देखील तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरेल. यासाठी तुमच्याकडे iOS डिव्हाइस असणे गरजेचे असून, हे तुमचे वॉलेट, चावी, बॅकपॅक सारख्या वस्तू शोधण्यास मदत करते. हे डिव्हाइस बॅटरीवर काम करते, जे बदलू देखील शकता. हे iOS वर फाइंड माय अ‍ॅपच्या माध्यमातून काम करते. वस्तू हरवल्यास ती शोधण्यासाठी याचा उपयोग करू शकता. आणि Amazon Echo केवळ स्मार्ट होम आणि असिस्टेंट टेक नसून, एक स्मार्ट ऑडिओ प्रोडक्ट देखील आहे. याद्वारे तुम्ही ३डी ऑडिओ इफेक्टमध्ये तुमच्या आवडीची गाणी ऐकू शकता. तसेच, August Smart Lock Pro चा घराच्या सुरक्षेसाठी खूपच उपयोग होईल. तुम्ही जर प्रवासामुळे घरापासून लांब राहत असाल तर घराच्या सुरक्षेसाठी हे स्मार्ट लॉक खूपच उपयोगी ठरेल. हे लॉक तुमच्या डेडबोल्टवर फिट बसते. तुमच्या घराला स्मार्ट आणि सुरक्षित बनविण्यासाठी हे गॅजेट्स नक्कीच उपयोगी ठरतील. वाचा: वाचा वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/276k38J

Comments

clue frame