नवी दिल्ली: मार्केटमध्ये दररोज नवनवीन ट्रेंड सेट होताना दिसत आहे. स्मार्टफोन कंपन्या नवीन डिझाइन, कॅमेरा आणि फीचर्ससह येणारे हँडसेट्स सादर करत आहेत. खासकरून कंपन्या कॅमेऱ्यावर विशेष लक्ष केंद्रीत करत आहेत. बाजारात १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणारे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. मात्र, आता यापेक्षाही पुढे जाऊन १९४ मेगापिक्सलसह येणारा स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. लीक रिपोर्ट्सनुसार, कंपनी नावाने १९४ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणारा स्मार्टफोन सादर करेल. कंपनीला २०० मेगापिक्सल स्मार्टफोन सादर करायचा होता. मात्र, सध्याच्या मॉडेलमध्ये काही मेगापिक्सल कमी करण्यात आले आहे. वाचा: भन्नाट फीचर्ससह येईल हा फोन लीक रिपोर्ट्सनुसार, अन्य फीचर्समुळे Motorola Frontier स्मार्टफोन इतर हँडसेट्सच्या तुलनेत जबरदस्त असेल. फोनला १४४ हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्टसह सादर केले जाईल. यात १२५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची दमदार बॅटरी दिली देण्याची शक्यता आहे. सोबतच, ५० वॉट वायरलेस चार्जिंगचा देखील सपोर्ट मिळेल. रिपोर्टनुसार, कंपनी Motorola Frontier स्मार्टफोनला यावर्षी जुलैमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. टिप्सटर Evan Blass ने अपकमिंग स्मार्टफोन Motorola Frontier बाबत माहिती दिली आहे. टिप्स्टरनुसार, फोनला कर्व्ड डिस्प्ले डिझाइनमध्ये सादर केले जाईल. फोनमध्ये सेंटर एलाइन्ड पंच-होल कटआउट फ्रंट कॅमेरा दिला आहे. तर पॉवर बटन आणि वॉल्यूम रॉकर उजव्या बाजूला आहे. फोनमध्ये यूएसबी-टाइप-सी पोर्ट, स्पीकर ग्रिल आणि सिम कार्ड ट्रे दिला जाईल. फोनमध्ये मिळेल ६० MP सेल्फी कॅमेरा Motorola Frontier स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंच कर्व्ड एमोलेड डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये Qualcomm Snapdragon ८ Gen १ plus हा पॉवरफुल प्रोसेसर दिला जाईल. तसेच, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळेल. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर Motorola Frontier स्मार्टफोनमध्ये १९४ मेगापिक्सल प्रायमरी लेंस सपोर्ट मिळेल. याशिवाय ५० मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा, १२ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा दिला जाईल. तर फ्रंटला ६० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. Motorola च्या या अपकमिंग धमाकेदार स्मार्टफोनची किंमत किती असेल हे मात्र लाँचिंगनंतरच समजू शकेल. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ohUJbZP
Comments
Post a Comment