वारंवार रिचार्ज करण्याची गरजच नाही! ८४ दिवसांच्या वैधतेसह येणारे ‘हे’ आहेत बेस्ट प्रीपेड प्लान्स, किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी
नवी दिल्ली: टेलिकॉम कंपन्या , आणि आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या वैधतेसह येणारे प्लान्स ऑफर करत आहेत. अनेक ग्राहक दरमहिन्याला रिचार्ज करत बसण्यापेक्षा एकदाच तीन महिन्यांचे किंवा वर्षाभराचे प्लान्स घेतात. यामुळे वारंवार रिचार्ज करत बसण्याची गरज नाही. तुम्ही देखील असेच प्लान्स शोधत असाल तर कंपन्यांकडे काही चांगले रिचार्ज उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ८४ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लान्सची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लान्समध्ये डेटा, कॉलिंग, एसएमएससह अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळेल. कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देणाऱ्या या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: रिलायन्स जिओचा ३९५ रुपयांचा प्रीपेड प्लान रिलायन्स जिओकडे ३९५ रुपयांच्या किंमतीत येणारा एक शानदार प्लान उपलब्ध आहे. जिओच्या या प्लान्सची वैधता ८४ दिवस असून, यामध्ये एकूण ६ जीबी डेटा मिळतो. याशिवाय प्लानमध्ये एकूण १००० एसएमएस देखील मिळतील. तसेच, देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. या प्लानमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यामध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या जिओ अॅप्सचा मोफत अॅक्सेस मिळेल. वोडाफोन आयडियाचा ४५९ रुपयांचा प्रीपेड प्लान टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडियाकडे ४५९ रुपये किंमतीत येणारा स्वस्त प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता देखील ८४ दिवस असून, यामध्ये संपूर्ण कालावधीसाठी एकूण ६ जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची देखील सुविधा मिळते. तसेच, प्लानमध्ये एकूण १००० मोफत एसएमएस दिले जात आहे. या प्लानमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यात Vi Movies & TV चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. एअरटेलचा ४५५ रुपयांचा प्रीपेड प्लान टेलिकॉम कंपनी एअरटेलकडे देखील ८४ दिवसांच्या वैधतेसह येणारा एक स्वस्त प्लान उपलब्ध आहे. एअरटेलच्या ४५५ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये एकूण ६ जीबी डेटा मिळेल. याशिवाय देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची देखील सुविधा मिळते. प्लानमध्ये एकूण ९०० एसएमएस मिळतात. या प्रीपेड प्लानमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यामध्ये Amazon Prime Video मोबाइल एडिशनचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय Hello Tunes, Wynk Music चा मोफत अॅक्सेस देखील मिळतो. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/nh7Z8x9
Comments
Post a Comment