युजर्सना झटका, या कंपनीने कमी केली फर्स्ट रिचार्ज प्लानची व्हॅलिडिटी, डेटामध्येही कपात, पाहा डिटेल्स
नवी दिल्ली: सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने त्यांच्या २९४ रुपयांच्या पहिल्या रिचार्ज प्लानच्या वैधतेत रिव्हिजन जाहीर केले आहे. २४९ रुपयांचा प्लान कंपनीच्या FRC मधील सर्वात लोकप्रिय प्रीपेड रिचार्ज प्लानपैकी एक आहे. हे रिव्हिजन १ मार्च २०२२ पासून सर्व दूरसंचार मंडळांमध्ये लागू होईल. अहवालानुसार, नवीन प्रीपेड मोबाइल ग्राहक ज्यांनी २४९ रुपयांच्या FRC प्लानसह त्यांचे नंबर सक्रिय केले आहेत त्यांना १ मार्च 2022 पासून ४५ दिवसांची वैधता, अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि इतर फायदे मिळतील. वैधतेसह डेटा देखील कमी: आतापर्यंत बीएसएनएलच्या २४९ रुपयांच्या पहिल्या रिचार्ज प्लानमध्ये ६० दिवसांची वैधता उपलब्ध होती. प्लानची वैधता आता ४५ दिवसांवर आली आहे. प्लानमध्ये दररोज २ GB डेटा मिळतो. म्हणजेच प्लानमध्ये आधी १२० GB डेटा उपलब्ध होता. जो १ मार्चपासून ९० GB डेटापर्यंत कमी केला जाईल. म्हणजेच या फर्स्ट रिचार्ज प्लानमध्ये आता ३० GB कमी डेटा मिळणार आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग ४० Kbps इतका कमी होईल. अमर्यादित कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस: BSNL च्या या पहिल्या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला कोणत्याही FUP मर्यादेशिवाय अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो. म्हणजेच तुम्ही कोणत्याही नंबरवर मोफत कॉल करू शकता. प्लानमध्ये यूजर्सला दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळेल. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या सध्याच्या मोफत सुविधांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सरकारी दूरसंचार कंपनीने अलीकडेच त्यांच्या इतर काही प्रीपेड प्लॅन व्हाउचर आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचरमध्ये बदल केले आहेत. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे ३४७ रुपयांच्या किंमतीत येणारा शानदार प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. तुम्ही जर ५६ दिवसांच्या वैधतेसह येणारा स्वस्त प्लान शोधत असाल तर बीएसएनएलकडे एक शानदार प्लान उपलब्ध आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएल जबरदस्त बेनिफिट्स देत आहे. कंपनीकडे ३४७ रुपयांचा प्लान असून, यामध्ये ५६ दिवसांची वैधता मिळतो. या प्लानमध्ये ५६ दिवस दररोज २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा देखील मिळते. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/TqC9RI1
Comments
Post a Comment