नवी दिल्ली: ने वर सुरू केले आहे. पहिल्या दिवसाच्या युद्धात जवळपास १०० पेक्षा अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, केवळ शस्त्राद्वारेच नाही तर इंटरनेटच्या जगात देखील हे युद्ध सुरू आहे. रिपोर्टनुसार, युक्रेनवर मोठा सायबर हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनच्या अनेक सरकारी वेबसाइट्सला हॅक करण्यात आले आहे. मॅलवेयरद्वारे हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. Wiper मॅलवेअयरद्वारे कोणत्याही सिस्टमध्ये स्टोर असलेला डेटा कायमचा डिलीट करता येतो. म्हणजेच, डेटा रिकव्हर करणे पुन्हा शक्य होत नाही. तसेच, काही हॅकिंग टूल्सला काही दिवसांपूर्वीच तयार करण्यात आल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. वाचा: या टूल्सचा वापर करून सायबर हल्ला केला जात आहे. या मॅलवेयरचे काउंटरअटॅक सॉफ्टवेअर बनवण्यासाठी वेळ लागू शकतो. ज्याचा फायदा हॅकर्सला मिळत आहे. Wiper इंफेक्टेड सिस्टममधील सर्व डेटा डिलीट करू शकतो. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हा डेटा पुन्हा रिकव्हर करणे शक्य नाही. म्हणजेच, एकदा डिलीट झालेला डेटा पुन्हा मिळणार नाही. इतर पब्लिक मॅलवेयरप्रमाणे याचा वापर पैसे चोरी करणे अथवा सिस्टमला कंट्रोल करण्यासाठी केला जात नाही. Wiper मॅलवेयरचा उद्देश सिस्टमला पूर्णपणे नष्ट करणे हा आहे. त्यामुळेच, युद्धाच्या वेळी Wiper मॅलवेअरचा वापर केला जातो. Wiper मॅलेवेयर कशाप्रकारे करतो टार्गेट? Wiper मॅलवेयरचा वापर करण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे पुरावा नष्ट करणे हा आहे. म्हणजेच, जे कोणी याचा वापर करते ते समोर येऊ इच्छित नाही. रिपोर्टनुसार, रशियाद्वारे या मॅलवेयरचा वापर करून युक्रेनवर सायबर हल्ला केला जात आहे. मात्र, रशियाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. Wiper सिस्टम रिकव्हरी टूल्सवर हल्ला करण्यास सक्षम आहे. मॅलवेअर ह्यूमन एरॉर अथवा सायबर हायजिनच्या त्रुटीचा फायदा घेऊन सिस्टमला टार्गेट करतो. यापासून बचावासाठी सिक्योरिटी एक्सपर्ट्स कोणत्याही संशयास्पद फाइल अथवा सॉफ्टवेअरला डाउनलोड न करण्याचा सल्ला देतात. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8p5m2RK
Comments
Post a Comment